ट्विंकल खन्नाने शेअर केला फोटो, जेव्हा लेकीसाठी अक्षय कुमार बनला होता सांताक्लॉज
By गीतांजली | Updated: December 26, 2020 19:00 IST2020-12-26T19:00:00+5:302020-12-26T19:00:03+5:30
ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बरेच मजेशीर पोस्ट शेअर करत असते.

ट्विंकल खन्नाने शेअर केला फोटो, जेव्हा लेकीसाठी अक्षय कुमार बनला होता सांताक्लॉज
यावर्षीच्या ख्रिसमस सेलिब्रेशन कोरोनामुळे काहीसे फिके पडले आहे. जगभरात ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताना काळजी घेतली जाते आहे. याच दरम्यान अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट करून सोशल डिस्टंसिंगवर भाष्य केले आहे. या फोटोमध्ये तिची मुलगी नितारा आणि पती अक्षय कुमार दिसतोय.
या फोटोमध्ये अक्षय कुमार सांताक्लॉज बनलेला दिसतोय. त्याच्या मुलीच्या हातात गिफ्ट दिसतेय. अक्षय तिने किस करताना दिसतो आहे. ट्विंकलने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, यावर्षी मला असे वाटते की, सांतासुद्धा सोशल डिस्टंसिंगचे पालन करतो आहे. यासह तिने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बरेच मजेशीर पोस्ट शेअर करत असते. त्यांचे कॅप्शनदेखील फनी असतात. अलीकडेच तिने एक फोटो पोस्ट केले होता ज्यात अक्षयने पत्नी ट्विंकलसारखाच ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. शेअर केलेल्या फोटोत दोघेही मजेशीर अंदाजात पाहायला मिळाले होते.
2021 मध्ये अक्षय कुमारचे शेड्यूल व्यस्त असणार आहे. अक्षयकडे तब्बल 6 सिनेमे आहेत. जे 2021मध्येच रिलीज होणार आहेत. कोरोना काळातही अक्षय कुमार सिनेमांचे शूटिंग करत होता.