टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह, करत होती मालिकेचे शूटिंग

By गीतांजली | Updated: September 24, 2020 12:59 IST2020-09-24T12:52:54+5:302020-09-24T12:59:11+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.

TV actress shweta tiwari tested corona positive | टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह, करत होती मालिकेचे शूटिंग

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह, करत होती मालिकेचे शूटिंग

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, श्वेता कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिने स्वत:ला घरात क्वॉरंटाईन केले आहे. श्वेता म्हणाली, हा कठिण काळ आहे पण आपल्याला सावधानी बाळगत वेळेत उपचार घ्यायला हवेत. 

श्वेताने स्वत:ला केलं क्वॉरंटाईन
टीव्ही मालिका 'मेरे डॅड की दुल्हन'मध्ये श्वेता मुख्य भूमिका साकारते आहे. रिपोर्टनुसार श्वेता म्हणाली, मला स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणं जाणवली, 16 सप्टेंबरला माझी तब्येत बिघडली. यानंतर तिने शूटिंगसोडून लगेच कोरोना टेस्ट केली. ती म्हणाले की, मला कोणत्याही प्रकाराचा निष्काळजीपणाने करायचा नव्हता, मी लोकांच्या आसपास होतो आणि बरेच लोक माझ्या आजूबाजूला होते.

श्वेताने सांगितले की, तिचा को-स्टार वरुण बदोलाने काही आठवड्यांपूर्वीच स्वत:ला क्वॉरंटाईन केले होते, जेव्हा त्यांची पत्नी राजेश्वरी सचदेव कोरोना पॉझिटीव्ह आली. श्वेता 1 ऑक्टोबरपर्यंत होम क्वॉरंटाईन राहू शकते अशी माहिती आहे. श्वेता तिवारी 'बिग बग सीझन 4'ची विजेता आहे. एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की'मधील प्रेरणाच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती.  


आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण
आतापर्यंत अनेक टीव्ही कलाकार कोरोना झाला आहे. यात राजेश्नरी सचदेव, दिशा परमार, 'भाबीजी घर पर है' मालिकेचा   निर्माता संजय कोहला, अभिनेता संजय कौशिक, करम राजपाल, हिमांशु सोनी, राजेश कुमार, हिमांश कोहली, जरीना वहाब, मलायका अरोरा आणि हिमानी शिवपुरीचे नाव या लिस्टमध्ये सामील आहे. 
 

Web Title: TV actress shweta tiwari tested corona positive