"तोंडात फोड आले अन्...", लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्करची झालीये 'अशी' अवस्था, पती शोएब म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:36 IST2025-07-14T10:32:59+5:302025-07-14T10:36:20+5:30

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दिपिका कक्कर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे.

tv actress dipika kakar husband shoaib ibrahim shared wife health update after post liver cancer surgery  | "तोंडात फोड आले अन्...", लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्करची झालीये 'अशी' अवस्था, पती शोएब म्हणाला...

"तोंडात फोड आले अन्...", लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर दीपिका कक्करची झालीये 'अशी' अवस्था, पती शोएब म्हणाला...

Deepika Kakarr Health Update: 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दिपिका कक्कर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे. सध्या दीपिका तिच्या लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीमुळे चर्चेत आहे.काही दिवसांपूर्वीच तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता दीपिका हळूहळू बरी होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीचा पती शोएब सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून तिच्या हेल्थिविषयी अपडेट देत असतो. अशातच शोएबने अलिकडेच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये पत्नीच्या आरोग्याविषयी चिंता वाढवणारी माहिती शेअर केली आहे. 

दीपिका कक्करचा पती शोएब इब्राहिमने नुकताच त्यांचा मुलगा रुहानसोबत एक व्लॉग शेअर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने म्हटलं, आजुपासून दीपिकाची टार्गेटेड थेरपी सुरु झाली आहे. आज पहिला दिवस आहे तिला थोडं बरं वाटलं, पण दुसऱ्या थेरपीवेळी तिला थोडा त्रास झाला. तिच्या तोंडात फोड आले. 

पुढे शोएबने सांगितलं, "थेरपीनंतर दीपिकाने मला सांगितलं की तिला थकवा आल्यासारखं जाणवत आहे, पण ती बरी आहे. ती रुहानसोबत काही वेळ बाहेर गेली होती त्यामुळे कदाचित तिला थकला आला असेल.  शिवाय तोंडात फोड येणार, याबद्दल डॉक्टरांनी आम्हाला पूर्वकल्पना दिली होती. त्यासाठी तिला जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. पण, ती बरी होईल."

दीपिकाची सर्जरी १४ तास चालली. नंतर ती आयसीयूतून बाहेर आली. आपल्या दीड वर्षांच्या मुलासाठी दीपिकाचा जीव तुटत होता. त्याला भेटून ती खूश झाली. दुसरीकडे तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम तिची दिवसरात्र काळजी घेत होता. व्लॉगमधून तो तिच्याबद्दल माहिती देत होता. आता दीपिका बरी होत असून अनेकांनी तिच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. 

Web Title: tv actress dipika kakar husband shoaib ibrahim shared wife health update after post liver cancer surgery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.