तुषार कपूरच्या मुलाचा स्मृती इराणीसोबत जमला याराना

By Admin | Updated: May 17, 2017 18:14 IST2017-05-17T17:37:11+5:302017-05-17T18:14:56+5:30

‘दुष्मनी’ बदल गयी दोस्ती में?.. तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य, बागडतोय स्मृती इराणींच्या अंगाखांद्यावर.

Tushar Kapoor's son will come together with Smriti Irani | तुषार कपूरच्या मुलाचा स्मृती इराणीसोबत जमला याराना

तुषार कपूरच्या मुलाचा स्मृती इराणीसोबत जमला याराना

tyle="text-align: justify;"> - मयूर पठाडे / ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेता तुषार कपूरनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला आणि आता तो ‘सिंगल फादर’ आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण या मुलानं जन्मापासूनच कपूर खानदानकी झोली खुशियों से भर दी है.सरोगसीच्या संदर्भात नवा कायदा येण्याच्या आधीच तुषार कपूर आणि निर्माता करण जोहर हे सरोगसीच्या माध्यमातून पिता बनले. आता सरोगसीच्या पद्धतीनं सिंगल फादर बनणं तसं अवघडच आहे, पण या माध्यमातून ते आता ‘फॅमिली’चा आनंद अनुभवताहेत. 

तुषार कपूरनं त्याच्या मुलाचं नाव ठेवलं आहे लक्ष्य. अर्थातच त्याला चांगल्या पद्धतीनं वाढवणं, त्याच्यावर उत्तम संस्कार करणं आणि भविष्यात त्याला ‘माणूस’ म्हणून घडवणं हेच कपूर कुटुंबियांचं पहिलं ‘लक्ष्य’ आहे. तसं त्यांनी बोलूनही दाखवलंय.
सिने अभिनेत्याच्या घरात जन्माला आलेला लक्ष्य चांगलाच खोडकर आहे. त्याच्या बाळलीलांनी कपूर घराण्यात आनंदाला उधाण आलं आहे. त्याच्या गुटगुटीत बाळशानं अनेकांना आपलंसंही केलं आहे. परवाच या बाळानं आपल्या करामतींनी केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनाही हरखून टाकलं. त्यांच्या अंगाखांद्यावर नाचताना त्यानं अनेक करामतीही केल्या. स्मृती इराणीही त्यामुळे खुश झाल्या आणि लक्ष्यबरोबरच हे फोटो त्यांनी व्हायरलही केले.
 
 
स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर तुषार कपूरच्या मुलासोबतचे फोटो शेअर केले, तर एकता कपूरनंही स्मृती इराणी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडीयावर शेअर करताना त्याला कॅप्शन (फोटोखालची ओळ) दिली. ‘फ्रेण्डस लाइक फॅमिली’. स्मृती इराणी यांचा 15 वर्षांपूर्वी उद्योजक झुबीन इराणी यांच्यासोबत विवाह झाला. तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य याच्या जन्मानंतर त्यांच्या घरात बर्‍याच काळानंतर एका लहान मुलाचं आगमन झाल्यानं त्यांच्या घरात आनंदाच्या लाटा बरसताहेत, पण त्याच्यामुळे दोन घराण्यांतला जुना दोस्ताना नव्यानं सुरू झाल्यानं लक्ष्य आता सगळ्यांच्याच गळ्यांतला ताईत बनला आहे. 

Web Title: Tushar Kapoor's son will come together with Smriti Irani