"आजोबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे", विलासरावांना नातवांकडून आदरांजली, रितेशने शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 21:11 IST2023-08-14T21:09:11+5:302023-08-14T21:11:34+5:30
vilasrao deshmukh : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे.

"आजोबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे", विलासरावांना नातवांकडून आदरांजली, रितेशने शेअर केले फोटो
riteish deshmukh : राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे फक्त बॉलिवूडच नाही तर सोशल मीडियावरही सर्वांचे लाडके कपल आहे. ते त्यांच्या गोंडस केमिस्ट्री आणि मजेदार विनोदाने त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कधीही कमी पडत नाहीत. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि रिल्सला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. ते दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. रितेशने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खास पोस्ट केली आहे.
रितेश देशमुखच्या मुलांनी आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. ""आजोबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे", अशा आशयाचे कॅप्शन रितेशने दिले आहे.
We love you Ajoba !! #VilasraoDeshmukhpic.twitter.com/9vsWKJmxWl
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2023
आज १४ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. विलासरावांची सून आणि अभिनेत्री जिनिलियाने देखील सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करून आपल्या सासऱ्यांना आदरांजली वाहिली. तिने या पोस्टमध्ये सासऱ्यांसोबतचा लग्नातला फोटो शेअर करत लिहिले की, प्रिय पप्पा, मला फक्त सांगायचे आहे की तुम्ही विचार करायला खूप छान आहात, पण तुमच्याशिवाय जगणं खूप कठीण आहे. मला खात्री आहे की, तुम्ही कुठेही असलात तरी ते सर्वात खास ठिकाण असले पाहिजे. कारण तुमच्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची क्षमता आहे. पुन्हा भेटेपर्यंत, आम्हाला तुमची खूप आठवण येते पप्पा.
रितेश देशमुख आणि जिनिलियाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कस' चित्रपटाच्या सेटवर रितेश-जिनिलियाची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर 'तेरे नाल लव्ह हो गया' या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटातून पुन्हा एकदा रितेश-जिनिलिया ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बरेच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जिनिलिया बराच मोठा काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. ‘वेड’मधून तिने पुन्हा कमबॅक करत मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. रितेश आणि जिनिलियाला दोन मुले आहेत.