तैमूरचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!

By Admin | Updated: July 8, 2017 05:07 IST2017-07-08T05:07:00+5:302017-07-08T05:07:00+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याच्या नावचे सोशल मीडियावर पेज देखील आहे. सध्या त्याचा एक फोटो व्हायरल

Timur's photo is sitting in the balcony! | तैमूरचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!

तैमूरचा बाल्कनीत बसलेला फोटो व्हायरल!

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर याच्या नावचे सोशल मीडियावर पेज देखील आहे. सध्या त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तैमूर बाल्कनीतल्या झोपळ्यावर बसलेला आहे. एकीकडे लोक तैमूर कपूर आहे की खान, याची चर्चा करीत आहेत तर दुसरीकडे तो मात्र आपल्या निरागस हास्याने सगळ्यांचे लक्ष वेधतो आहे. करिनाने नुकतेच एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘मी तैमूरच्या जन्मापासून आतापर्यंत त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करतेय. तो माझे आणि सैफचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मला नेहमीच वाटते तैमूर माझ्या वडिलांसारखा जास्त दिसतो. कारण, मी माझ्या वडिलांसारखी दिसते. माझे आणि सैफचे नेहमीच या विषयावर मतभेद होतात की, तैमूर नेमका कोणासारखा दिसतो. मी म्हणते तो कपूर खानदानसारखा दिसतो तर सैफचे म्हणणे असते तो पतौडी खानदानवर गेला आहे." तैमूरचे डोळे मात्र त्याचे आजोबा रणधीर कपूर आणि मावशी करिश्मा कपूरसारखे आहेत, एवढे मात्र नक्की.’

Web Title: Timur's photo is sitting in the balcony!