टायगर घेतोय मार्शल आर्टस् ट्रेनिंग

By Admin | Updated: August 13, 2014 08:57 IST2014-08-13T08:57:43+5:302014-08-13T08:57:43+5:30

‘हिरोपंती’च्या यशानंतर टायगर श्रॉफबाबत निर्माते-दिग्दर्शकही गांभीर्याने विचार करीत आहेत. ‘हिरोपंती’चे निर्माता साजीद नादियाडवाला टायगरसोबत लवकरच एक नवा अ‍ॅक्शन चित्रपट सुरू करणार आहे.

Tiger-taking martial arts training | टायगर घेतोय मार्शल आर्टस् ट्रेनिंग

टायगर घेतोय मार्शल आर्टस् ट्रेनिंग

‘हिरोपंती’च्या यशानंतर टायगर श्रॉफबाबत निर्माते-दिग्दर्शकही गांभीर्याने विचार करीत आहेत. ‘हिरोपंती’चे निर्माता साजीद नादियाडवाला टायगरसोबत लवकरच एक नवा अ‍ॅक्शन चित्रपट सुरू करणार आहे. या चित्रपटातील टायगरचे अ‍ॅक्शन सीन्स सर्वात वेगळे असतील, असे सांगण्यात येत आहे. टायगरने त्याच्या पहिल्याच चित्रपटात बरेचसे हैराण करणारे स्टंटस् केले होते. टायगर तसा स्टंटस्मध्ये पारंगत आहे, पण मार्शल आर्टस्च्या स्पेशल ट्रेनिंगसाठी साजीदने त्याला थायलंडला पाठवले आहे. साजीदच्या मते, ‘हिरोपंती’तील टायगरची अ‍ॅक्शन हा फक्त ट्रेलर होता. त्याच्या आगामी चित्रपटातील अ‍ॅक्शन यादगार ठरतील. त्यामुळेच टायगरला प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. टायगर स्वत:ला मार्शल आर्टिस्ट मानतो, पण त्याच्या मते, या क्षेत्रात सातत्याने शिकत राहणे गरजेचे आहे.

Web Title: Tiger-taking martial arts training