टायगरने ठोकरली ‘राम-लखन’ची आॅफर

By Admin | Updated: September 11, 2014 02:16 IST2014-09-11T02:16:59+5:302014-09-11T02:16:59+5:30

‘राम-लखन’च्या रिमेकची आॅफर टायगर श्रॉफने फेटाळली आहे.‘राम-लखन’मध्ये जॅकी श्रॉफने केलेली भूमिका साकारण्याची आॅफ टायगरला मिळाली होती.

Tiger stumbled, 'Ram-Lakhan's offer' | टायगरने ठोकरली ‘राम-लखन’ची आॅफर

टायगरने ठोकरली ‘राम-लखन’ची आॅफर

‘राम-लखन’च्या रिमेकची आॅफर टायगर श्रॉफने फेटाळली आहे. ‘राम-लखन’मध्ये जॅकी श्रॉफने केलेली भूमिका साकारण्याची आॅफ टायगरला मिळाली होती. ‘हीरोपंती’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे २४ वर्षीय टायगर श्रॉफ सध्या हवेत आहे. ‘वडिलांच्या कोणत्याही चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची माझी इच्छा नाही. आम्ही दोघे अत्यंत भिन्न आहोत. वडिलांशी माझी तुलना केली जाऊ नये अशी इच्छा आहे, असे टायगरने सांगितले. दिग्दर्शक रोहित शेट्टी हा सुभाष घई यांच्या १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘राम-लखन’चा रिमेक बनविणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि डिम्पल कपाडिया यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Web Title: Tiger stumbled, 'Ram-Lakhan's offer'