बॉलीवूडचे तीन दिग्गज येणार एकत्र

By Admin | Updated: August 25, 2014 04:54 IST2014-08-25T04:54:33+5:302014-08-25T04:54:33+5:30

निर्माता दिग्दर्शक करण जोहर आता १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राम लखन’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे.

Three Bollywood stars will come together | बॉलीवूडचे तीन दिग्गज येणार एकत्र

बॉलीवूडचे तीन दिग्गज येणार एकत्र

निर्माता दिग्दर्शक करण जोहर आता १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राम लखन’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार असून सुभाष घई या चित्रपटाचे सह निर्माता असणार आहेत. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज होईल. करणने मूळ ‘राम लखन’ या चित्रपटाचे पोस्टर टिष्ट्वटरवर पोस्ट केले असून त्यावर लिहिले आहे की, ‘रोहित शेट्टी, धर्मा प्रोडक्शन्स आणि मुक्ता आर्टस एका आयकॉनिक ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये सोबत असतील.’ मूळ चित्रपटातील जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्या भूमिका कोण निभावतील हे अद्याप ठरलेले नाही; पण या भूमिकांसाठी वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या नावांची जोरदार चर्चा आहे. करण जोहर आणि रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.

Web Title: Three Bollywood stars will come together