"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:09 IST2025-08-27T16:08:02+5:302025-08-27T16:09:10+5:30

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी दरवर्षी तिच्या घरी गणपती बाप्पा आणते. पण यावर्षी तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. ज्यामुळे बाप्पा यावर्षी तिच्या घरी आले नाहीत.

''This year, the house feels incomplete without you...'', Shilpa Shetty gets emotional after not bringing Ganpati Bappa home | "यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी

"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी

आज गणेश चतुर्थी आहे आणि अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. दरवर्षी मराठीप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दरवर्षी गणपती बाप्पाला तिच्या घरी आणते आणि त्यांचे जल्लोषात स्वागत करते. पण यावेळी तिची २२ वर्षांची परंपरा मोडली आहे. तिने यावर्षी बाप्पाला तिच्या घरी आणले नाही. तिने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. आता गणेश चतुर्थीच्या दिवशी शिल्पा बाप्पाला खूप मिस करत आहे. तिने गेल्या अनेक वर्षांच्या उत्सवांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासह आरती करताना दिसत आहे. काहींमध्ये ती विसर्जनादरम्यान नाचताना दिसत आहे. संपूर्ण कुटुंब गणपती उत्सवात मजा करताना दिसत आहे. ती हे सर्व आठवून भावुक झाली आहे. शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, ''या वर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटते, पण मन तुमच्या आशीर्वादांनी भरलेले आहे.'' शिल्पाच्या या व्हिडीओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले- गणपती बाप्पा मोरया. दुसऱ्याने लिहिले- शिल्पा मॅडम.


शिल्पाने २२ वर्षांची परंपरा का मोडली?
शिल्पा शेट्टीने २५ ऑगस्ट रोजी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने यावर्षी बाप्पाला घरी आणणार नसल्याचे सांगितले. तिने लिहिले, प्रिय मित्रांनो, मोठ्या दुःखाने तुम्हाला कळवावे लागत आहे की, कुटुंबातील एकाच्या निधनामुळे आम्ही यावर्षी गणपती उत्सव साजरा करू शकणार नाही. याचे आम्हाला खूप वाईट वाटत आहे. परंपरेनुसार, आम्ही १३ दिवस शोक करू, म्हणून आम्ही कोणत्याही धार्मिक उत्सवापासून दूर राहू. आम्हाला तुमच्या सहानुभूतीची आणि प्रार्थनांची अपेक्षा आहे. शिल्पाने कुंद्रा कुटुंबाच्या वतीने ही पोस्ट शेअर केली.
 

Web Title: ''This year, the house feels incomplete without you...'', Shilpa Shetty gets emotional after not bringing Ganpati Bappa home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.