लंडनमध्ये होतोय पहिला जातीविरोधी चित्रपट महोत्सव; कोणते कोणते मराठी सिनेमे दाखविणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:55 IST2025-04-14T12:55:05+5:302025-04-14T12:55:42+5:30

लंडन जातीविरोधी चित्रपट महोत्सव  लंडन विद्यापीठातील एसओएएस आंबेडकर सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

The first anti-caste film festival is being held in London; which Marathi films will be screened... | लंडनमध्ये होतोय पहिला जातीविरोधी चित्रपट महोत्सव; कोणते कोणते मराठी सिनेमे दाखविणार...

लंडनमध्ये होतोय पहिला जातीविरोधी चित्रपट महोत्सव; कोणते कोणते मराठी सिनेमे दाखविणार...

लंडन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी पहिला लंडन जातीविरोधी चित्रपट महोत्सव  लंडन विद्यापीठातील एसओएएस आंबेडकर सोसायटी तर्फे  दिनांक २५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करीत आहे. सिनेमाच्या माध्यमातून जातीअंतासाठीचा संघर्ष आणि आंबेडकर जयंती साजरी करण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे अशी माहिती एसओएएस आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉक्टरल रिसर्चर अभिषेक भोसले यांनी दिली आहे. 

हा चित्रपट महोत्सव एसओएएस आंबेडकर सोसायटी यांच्या पुढाकाराने आणि  एसओएएस साऊथ एशिया इन्स्टिट्युट, एलएसई आंबेडकर सोसायटी, एसएफआय युके आणि इंडिया लेबर सॉलिडॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. 

एसओएएस आंबेडकर सोसायटी हा लंडमधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक उपक्रम आहे,  जो भारत आणि जागतिक स्तरावर जात आणि विषमता यांवर गंभीर संवाद वाढवण्यासाठी आणि नवीन दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काम करत आहे. आंबेडकर सोसायटीच्या माध्यमातून जातीव्यवस्थेने शोषित समूहांच्या आवाजाला जागतिक पातळीवर बुलंद करणे आणि मुक्तीच्या राजकारणाची नव्याने व्याख्या करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. 

पहिला लंडन जातीविरोधी चित्रपट महोत्सवात जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, नागराज मंजुळे यांचा ‘फँड्री’, पा. रणजित यांचा ‘काला’, चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. सोबतच आनंद पटवर्धन यांचा ‘जयभीम कॉम्रेड’ हा माहितीपटही प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती अभिषेक भोसले यांनी दिली आहे .

Web Title: The first anti-caste film festival is being held in London; which Marathi films will be screened...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.