अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:57 PM2024-05-19T12:57:48+5:302024-05-19T12:59:11+5:30

तेलुगू अभिनेत्याने पत्नीच्या मृत्यूनंतर टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे.

Telugu television serial actor Chandrakant end his life after girlfriend death | अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात स्वतःला संपवलं

अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात स्वतःला संपवलं

Telugu Actor Chandrakant: तेलुगू सिनेसृष्टीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलुगू टेलिव्हिजन मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याचे निधन झालं आहे. अभिनेता चंद्रकांत याने शुक्रवारी तेलंगणातील अल्कापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. मात्र मृत्यू कशामुळे झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याच्या पत्नी पवित्रा जयरामचा काही दिवसांपूर्वीच अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवड्याभरानंतर अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या घरात सापडला. चंद्रकांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, अभिनेता गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३९ वर्षीय अभिनेता चंद्रकांत शुक्रवारी त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत  सापडला. अभिनेत्री आणि त्याची पत्नी पवित्रा हिच्या मृत्यूनंतर तो नैराश्यामध्ये होता. अभिनेता चंद्रकांत सोशल मीडियावर पवित्रासोबत घालवलेले सुंदर क्षणही शेअर करत होता. मात्र अचानक त्याने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. चंद्रकांतच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.

चंद्रकांत तेलंगणातील अल्कापूर येथे राहत होता. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. मला पवित्रासोबत राहायचे असल्याचे त्याने सांगितले होते, अशी माहिती चंद्रकांतच्या वडील व्यंकटेश यांनी दिली. चंद्रकांतने  पवित्रासाठी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्ट देखील केली आहे. कृपया परत ये. तू मला एकटे सोडलेस हे मला सहन होत नाही, असे चंद्रकांतने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पोलिसांनी सांगितले की, "चंद्रकांत शुक्रवारी सिकंदराबाद येथील घरातून निघून अल्कापूरच्या फ्लॅटवर गेला होता. चंद्रकांतच्या मित्रांनी त्याचा फोन केला पण कोणीही फोन उचलला नाही. त्यानंतर ते फ्लॅटवर पोहोचले तेव्हा तो मृतावस्थेत सापडला. पवित्रा जयराम यांच्या मृत्यूच्या अवघ्या आठवड्यानंतर चंद्रकांतने शुक्रवारी आत्महत्या केली."

चंद्रकांत आणि पवित्रा यांनी लग्न करून ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. काहींचे म्हणणे होते की दोघेही फक्त रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघेही एकाच घरात एकत्र राहत होते. एका मुलाखतीत चंद्रकांतने खुलासा केला होता की तो लवकरच त्याच्या नात्याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

Web Title: Telugu television serial actor Chandrakant end his life after girlfriend death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.