‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांपुढे जुबिन नौटियालने सादर केले शीर्षकगीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 15:43 IST2017-04-12T10:07:16+5:302017-04-12T15:43:57+5:30

कोणतीही नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेचे प्रोमो आणि मालिकेचे शीर्षकगीत हे दमदार असले तर रसिक त्या मालिकेकडे वळतात. ...

Zubin Nautiyal presented the title of 'Sun, I I Shazia Piazi' title song! | ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांपुढे जुबिन नौटियालने सादर केले शीर्षकगीत!

‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’च्या कलाकारांपुढे जुबिन नौटियालने सादर केले शीर्षकगीत!

णतीही नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेचे प्रोमो आणि मालिकेचे शीर्षकगीत हे दमदार असले तर रसिक त्या मालिकेकडे वळतात. त्यामुळे मालिकेच्या यशात त्या मालिकेच्या शीर्षकगीताचा मोठा वाटा असतो.शीर्षकगीत हिट ठरले तर मालिकाही सुपरहिट असे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. फक्त शीर्षकगीतामुळेच दिया और बाती हम ही मालिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. अगदी मालिका सुरू होण्यापूर्वीच प्रोमोच्या माध्यमातून कानावर पडणारे शीर्षकगीतामुळेच दिया और बाती मालिकेकडे रसिक वळू लागले होते.‘दिया और बाती हम’ या मालिकेचे कैलाश खेर आणि शुभा मुद्गल यांनी गायिलेले शीर्षकगीत खूपच लोकप्रिय ठरले.आता याच मालिकेचा पुढील भाग असलेल्या ‘तू सूरज,मै साँझ पियाजी’चे जुबिन नौटियाल आणि पलक मुच्छ लने  गायिलेले शीर्षकगीत नवे प्रेमगीत होण्याची शक्यता आहे. जुबिन आणि पलक यांनी या मालिकेचे नायक-नायिका असलेल्या उमाशंकर आणि कनक राठी यांच्यावर आधारित रोमँटीक गाणे गायले आहे.अलीकडेच नौटियालने ‘तू सूरज,मै साँझ पियाजी’च्या सेटला भेट दिली आणि तिथे त्याने या मालिकेच्या कलाकारांसाठी मालिकेचे शीर्षकगीत सादर केले. जुबिन सांगतो, एका अत्यंत लोकप्रिय मालिकेचे शीर्षकगीत गाणं हा मी माझा गौरव समजतो. मी आयुष्यात प्रथमच एखाद्या मालिकेच्या सेटवर गेलो असून मालिकेच्या कलाकारांपुढे शीर्षकगीत सादर करण्याचाही हा माझा पहिलाच अनुभव होता. या मालिकेच्या पूर्वीच्या आवृत्तीसाठी कैलाश खेर आणि शुभा मुद्गल यासारख्या दिग्गजांनी गीत गायलं होतं. या मालिकेचं शीर्षकगीत हे खूपच सुंदर असून ते आजही रसिक विसरलेले नाहीयेत.त्यामुळे मी गायलेले शीर्षगीतही आधीच्या मालिकेप्रमाणे रसिकांच्या पसंतीस उतरले अशी आशा करतो.

Web Title: Zubin Nautiyal presented the title of 'Sun, I I Shazia Piazi' title song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.