झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आठवणींनी भरलेलं.."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:31 PM2023-10-02T13:31:38+5:302023-10-02T13:32:16+5:30

ही लोकप्रिय मालिका आता अखेरच्या टप्प्यात आलीय लवकरच ती प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Zee marathi serial daar ughad baye goes off air lead actress share video on social media | झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आठवणींनी भरलेलं.."

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, "आठवणींनी भरलेलं.."

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी कोणती नवी मालिका सुरु होणार हे अद्याप कळलेले नाही. 

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दार उघड बये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची कथा संबळवादक मुक्ताचा संघर्षावर आधारित आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. मुक्ता, रावसाहेब, आजी आणि रेणुका हे कलाकार नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत येत असतात. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे बोललं जात आहे.

यादरम्यान मालिकेत अभिनेत्री  मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या सानिया चौधरी हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती मालिकेतील शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे काही क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले. 

हा व्हिडीओ शेअर करताना सानिया लिहिते,  प्रेम आणि आनंद आणि अविस्मरणीय आठवणींनी भरलेलं हे वर्ष! या शोसाठी आणि या ऑफस्क्रीन कुटुंबाचे मी मनापासून आभार मानते. आमच्या मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शूटमधील काही क्षण! असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

‘दार उघड बये’ मालिकेत सानिया चौधरीसह रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी आंबिये, भाग्यश्री दळवी आदींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.  कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकर मिळतील.  

Web Title: Zee marathi serial daar ughad baye goes off air lead actress share video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.