या शोसाठी रेखाने दिला आपला आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 10:24 IST2018-03-21T04:54:29+5:302018-03-21T10:24:29+5:30
गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान ...
.jpg)
या शोसाठी रेखाने दिला आपला आवाज
ग ली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलिवूड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.दोन दशकांपेक्षा जास्त काळ बॉलीवूड वर राज्य केले आणि इंडस्ट्रीचा 50 वर्षांपेक्षा जास्त काळ अविभाज्य भाग बनून राहिली आहे, ती आता 'रायजिंग स्टार 2'च्या मंचावरील सेलिब्रिटी घटक एका वेगळ्याच नव्या पातळीवर घेऊन जाणार आहे.लाइव्ह सिंगिंग रिअॅलिटी शो च्या या शनिवारच्या एपिसोडमध्ये ही सुंदर आणि असीम प्रतिभावान स्त्री स्पर्धकांना प्रोत्साहन देणार आहे आणि त्यांना शहाणपणाचे काही शब्द सांगणार आहे.एवढेच नाही तर रेखा उमराव जान मधील तिचे अविस्मरणीय प्रसिध्द इन ऑंखों की मस्ती के हे गाणे गुणगुणणार आहे, रायझिंग स्टार २च्या प्रोमोसाठी, जे लवकरच चॅनेल वर येईल.चंदेरी पडद्यावरील क्वचित दिसण्याविषयी बोलताना, रेखाजी म्हणाल्या, “संगीत हे सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे.माझा विश्वास आहे की ते तुम्हाला मुक्त करते. रायझिंग स्टार 2 या मंचातून स्पर्धकांना त्यांच्या आत्म्यातील संगीत शोधण्यासाठी सक्षम केले आहे कलर्स ने आणि या शनिवारी भारताच्या पहिल्या लाइव्ह सिंगींग रिअॅलिटी शो वर येऊन उभरत्या टॅलेंटचा आस्वाद घेण्याची मी वाट पहात आहे.” कलर्स वरील स्त्रोतांनी सांगीतले, “शो च्या प्रोमो साठी रेखाजींचा आवाज मिळाल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे, त्यांनी इन ऑखों के मस्ती के या त्यांच्या हृदयात जतन केलेल्या अनेक गाण्यांपैकी एक गायले आहे.” नेहमी प्रशंसा केलेल्या आणि पाहिलेल्या अभिनेत्रीशी संवाद साधण्यासाठी स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.आता थोडेच स्पर्धक राहिले असल्यामुळे आणि जाणाऱ्या प्रत्येक आठवड्याला स्पर्धा तीव्र होत चालली असताना,रेखाचे उपस्थित राहणे म्हणजे स्पर्धकांना थोडा विसावा मिळाल्यासारखे आहे.या आठवड्यात त्यांना गरज असणारी प्रेरणा सुध्दा मिळेल.