तू माझा सांगातीचे 700 भाग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 14:59 IST2016-09-28T09:29:05+5:302016-09-28T14:59:05+5:30
चिन्मय मांडलेकर, प्रमिती नरके यांच्या प्रमुख भूमिका असलेली तू माझा सांगाती या मालिकेचे 700 भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. ...

तू माझा सांगातीचे 700 भाग पूर्ण
च न्मय मांडलेकर, प्रमिती नरके यांच्या प्रमुख भूमिका असलेली तू माझा सांगाती या मालिकेचे 700 भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. संत तुकारामांच्या आयुष्यावर बेतलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत चिन्मयने तुकारामांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. चिन्मयच्या याआधीच्या तू तिथे मी या मालिकेत प्रेक्षकांना एक वेगळा चिन्मय पाहायला मिळाला होता. तुकारामांची भूमिका त्याने साकारलेल्या आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिकांपेक्षा खूप वेगळी असली तरी त्याने ती तितक्याच ताकदीने पेलली आहे. प्रमितीची तर ही पहिलीच मालिका असूनही तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. कोणत्याही पौराणिक मालिकेचे 700 भाग पूर्ण व्हायची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा आनंद संपूर्ण टीमने केक कापून साजरा केला.