​‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये संभावना सेठचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 09:18 AM2018-03-15T09:18:42+5:302018-03-15T14:48:42+5:30

संभावना सेठने पागलपन या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. त्यानंतर ती ...

'You are sun, I am in Samayj Piyaji' Chance Seth Tadka | ​‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये संभावना सेठचा तडका

​‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये संभावना सेठचा तडका

googlenewsNext
भावना सेठने पागलपन या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. त्यानंतर ती अब्बास-मस्तान यांच्या ३६ चायना टाऊन या चित्रपटात आशिकी में तेरी या गाण्यात झळकली. हे गाणे प्रेक्षकांना प्रंचड आवडले. या गाण्यामुळे संभावनाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर संभावना बिग बॉस या कार्यक्रमात झळकली. बिग बॉस या कार्यक्रमाच्या विजेतेपदाची ती प्रबळ दावेदार मानली जात होती. पण काहीच महिन्यात ती बिग बॉसच्या घरातून निघाली. त्यानंतर रझिया सुलतान या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत ती झळकली होती. तिने आजवर अनेक भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. वेलकम बॅक या चित्रपटात देखील ती आयटम साँगवर थिरकली होती. आता ती प्रेक्षकांना एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. तू सूरज, मैं साँझ पियाजी या मालिकेत तिची लवकरच एंट्री होणार असून या मालिकेत ती एक आयटम गीत सादर करून मालिकेला खमंग फोडणी देणार आहे.
सध्याच्या कथानकात निर्मात्यांना काहीतरी मनोरंजनात्मक हवे होते. त्यामुळे एखादे आयटम साँग मालिकेत असावे असे सगळ्यांना वाटत होते. आयटम साँगसाठी संभावना सेठशिवाय कोणीच योग्य असू शकत नाही असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे होते. त्यामुळे तिला आयटम साँगसाठी विचारण्यात आले आणि तिने देखील यासाठी लगेचच होकार दिला. 
संभावना सध्या आपल्या इतर कार्यक्रमांमध्ये खूपच व्यग्र आहे. त्यामुळे या गाण्यासाठी वेळ देणे तिला अवघड होते. तरीही तिने त्यातून वेळ काढून या मालिकेत छोटी भूमिका रंगविण्यास वेळ काढला.
‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ या मालिकेतील कनक (रिहा शर्मा) आणि उमाशंकर (अविनाश रेखी) यांची कथा दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेने नुकताच दोन वर्षांचा लीप घेतला असून त्यामुळे मालिकेचे कथानक अधिकच रंजक झाले आहे. मीरा मिठल (कंगना शर्मा) या नव्या व्यक्तिरेखेच्या प्रवेशामुळे मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळाले आहे. 

Also Read : बँकॉकमध्ये हरवला रिया शर्माचा पासपोर्ट

Web Title: 'You are sun, I am in Samayj Piyaji' Chance Seth Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.