तू सुरज मैं सांज पियाजी फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 15:03 IST2017-06-19T09:33:27+5:302017-06-19T15:03:27+5:30

दिया और बाती हम ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. या मालिकेतील सुरज आणि संध्या या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर ...

You are the hot avatar of Sanj Piazi Fame Madhura Naik | तू सुरज मैं सांज पियाजी फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार

तू सुरज मैं सांज पियाजी फेम मधुरा नाईकचा हॉट अवतार

या और बाती हम ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. या मालिकेतील सुरज आणि संध्या या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. पण या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.  
तू सुरज मैं सांज पियाजी हा दिया और बातीचा दुसरा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना पसंत पडत आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना सगळे नवे कलाकार पाहायला मिळत असले तरी या नव्या कलाकारांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळत आहे. 
तू सुरज मैं सांज पियाजी या मालिकेत पालोमी अतिशय संस्कारी, प्रत्येकाच्या शब्दाला मान देणारी मुलगी असल्याचे आपल्याला दाखवण्यात आले आहे. या मालिकेत ही भूमिका मधुरा नाईक साकारत आहे. मधुरा खऱ्या आयुष्यात या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड असून ती अनेकवेळा पाश्चिमात्य कपड्यांमध्येच पाहायला मिळते. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला विविध फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून यातील काही फोटोदेखील सोशल माडियाला पोस्ट केले आहेत. या सगळ्याच फोटोंमध्ये तिने शॉर्ट कपडे घातले आहे आणि विशेष म्हणजे यातील काही फोटोंमध्ये मधुराने बिकनीदेखील घातली आहे. 
तू सुरज मैं सांज पिया जी या मालिकेतील संस्कारी पालोमीचे हे रूप पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसला आहे. पण तिच्या या फोटोंना खूप सारे लाइक्स मिळाले असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Web Title: You are the hot avatar of Sanj Piazi Fame Madhura Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.