येतेय हेमांगी, भूषणची फ्रेश जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 06:51 IST2016-03-15T13:51:34+5:302016-03-15T06:51:34+5:30
रहस्यमय चित्रपटांची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे. गूढ, थरार आणि रहस्य यांचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच, रहस्य उकलण्याच्या ...

येतेय हेमांगी, भूषणची फ्रेश जोडी
रहस्यमय चित्रपटांची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे. गूढ, थरार आणि रहस्य यांचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच, रहस्य उकलण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळेच अनेक गोष्टींचा शोध लागला, अनेक गुपितं उघड झाली. गूढ आणि रहस्य हे दोन शब्द म्हटले कि भीती आलीच, या भीतीपासून मुक्तता व्हावी म्हणून रहस्याची उकल केली जाते. हा रहस्य उलगडण्याचा प्रवास प्रेक्षकांना आवर्जून चित्रपटगृहात घेऊन येतो. सशक्त कथा, नेटके दिग्दर्शन आणि त्यात रंग भरणारे अभिनयसंपन्न कलाकार हा योग जुळून आला तर ती एक आगळी चित्रपर्वणी असते. असाच एक योग जुळून आला आहे, तो निर्माते-दिग्दर्शक अनिल वाघमारे यांच्या ‘भूतकाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने.
चतुरस्त्र अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ आणि तरुणींचा हॉट क्रश, चॉकलेट बॉय भूषण प्रधान अशी फ्रेश जोडी मुख्य भूमिकेत पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कलावंतांच्या अभिनय क्षमतेला आव्हान देणारी कोकणच्या निसर्गरम्य पण गूढ पार्श्वभूमीवर उलगडणारी रहस्यमय भयकथा हे या सिनेमाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
सुट्टीत आपल्या गावी आलेल्या एका विज्ञानवादी मुलाच्या आयुष्यात घडणाºया काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे गूढ उकलले जाण्याची थरारक कथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हटके लोकेशन्स, प्रगत छायाचित्रण तंत्र आणि दिग्दर्शक अनिल वाघमारे हे स्वत: एक थ्रीडी इमेज तंत्रज्ञ असल्यामुळे अनेक वेगळे वास्तवाहून अकल्पित असे स्पेशल इफेक्ट यामुळे हा सिनेमा निश्चितच वेगळा ठरेल.
हेमांगी, भूषण यांच्यासोबत या चित्रपटात शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड, स्वाती भाभूरवडे हेदेखील आहेत. हिंदीतील संगीतकार सिद्धार्थ कपूरने संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी लिहलेल्या गीतांना जावेद अली, बेला शेंडे आणि सिद्धार्थ महादेवन यांनी स्वरबद्ध केले आहे. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन अनिल वाघमारे यांचे असून अतिथी शिबाग कपूर कार्यकारी निर्मात्या आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.