'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूचा डान्स बघून ओमच काय तुम्हीही व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:04 IST2021-04-29T17:00:38+5:302021-04-29T17:04:43+5:30
सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटूचा डान्स बघून ओमच काय तुम्हीही व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल!
सध्या येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. तिनं वर्ल्ड डान्स डेच्या निमित्तानं एक डान्स व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.. ज्यात ती अगदी उत्तम रित्या डान्स करताना दिसते आहे.. अन्विताला अभिनयासोबतच डान्सची देखील आवड आहे. यंदाच्या झी पुरस्कार सोहळ्यात ही स्वीटूनं आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता.
सध्या अन्विता परराज्यात मालिकेचं शुट करतेय.. दमन येथे येऊ कशी तशी मी नांदायलाची संपुर्ण टीम पोहोचलीये... स्मॉल स्क्रिनवरील टॉप मालिकांपैकी एक असणाऱ्या या मालिकेतील स्वीटूचा निरागस अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेणारा आहे.
अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे. अन्विताने चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. ‘चतुर चौकडी’ आणि 'रुंजी' या मालिकेतही तिने काम केलं