ये लाल इश्क... पाठकबाई आणि राणादा झाले भलतेच रोमँटिक, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 18:21 IST2022-10-14T18:20:59+5:302022-10-14T18:21:47+5:30
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

ये लाल इश्क... पाठकबाई आणि राणादा झाले भलतेच रोमँटिक, व्हिडीओ होतोय व्हायरल
झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते, पण त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप भावते. आता हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे लाइफ पार्टनर होणार आहेत. त्यामुळे त्या दोघांचे केळवण, बॅचलर पार्टीचे फोटो समोर येत आहे. दरम्यान आता अक्षया आणि हार्दिकचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे लाल इश्क या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आधी अक्षया पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. तर हार्दिक टीशर्ट आणि ट्रॅक पॅण्टमध्ये दिसतो आहे. या व्हिडीओत नंतर ते दोघे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीने त्यांच्या मित्रपरिवार-कुटुंबीयांसोबत केलेल्या केळवणाचेही फोटो समोर आले आहेत. त्यांच्या केळवणाचे फोटो समोर आले असले तरी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.