​फुलपाखरूचा यशोमान आपटे बनला गायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 15:02 IST2017-07-12T09:32:10+5:302017-07-12T15:02:10+5:30

मालिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी दिग्दर्शन करतं तर ...

Yashovan of the butterfly became a singer by profession | ​फुलपाखरूचा यशोमान आपटे बनला गायक

​फुलपाखरूचा यशोमान आपटे बनला गायक

लिकेतील कलाकार केवळ अभिनयातच अडकडून न राहता नवनवीन गोष्टी शिकण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी दिग्दर्शन करतं तर कोणी फोटोग्राफी. काही जण अभिनयाव्यतिरिक्त आपल्यात असणारे कलागुण जोपासत असतात. 'फुलपाखरू' या मालिकेत मानस म्हणजेच यशोमान आपटे प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनयासोबतच आता स्वतःच्या मालिकेसाठी तो एक गाणे गाणार आहे. मालिकेत मानस-वैदेही यांच्यासाठी एक रोमँटिक गाणे कम्पोज केले गेले असून यशोमानने स्वतःसाठी आवाज दिला आहे. सिनेमात अनेकदा हिरोने स्वतःसाठी प्लेबॅक केल्याचे आपण पाहिले आहे. पण मालिकेसाठी मात्र असे अपवादानेच घडते.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यशोमान आपटेने आपली छाप पाडली होती. डहाणूकर कॉलेजमधून बीकॉम झालेल्या यशोमानने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली दखल घ्यायला भाग पडले आहे. फुलपाखरू या मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. यशोमान साकारत असलेल्या मानस या व्यक्तिरेखेने तरुणाईच्या मनात घर केले आहे . यामुळे त्याच्या सोशल मीडिया फॅन फॉलोअर्समध्येही कमालीची वाढ झालीय. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे यशोमनने काहीतरी खास करण्याचा निर्णय घेतला आणि मालिकेत शूट होणाऱ्या एका गाण्यासाठी गायचे ठरवले. गायिका कीर्ती किल्लेदारसोबत गाण्याची संधी यशोमानला मिळाली आहे. विशाल-जगदीश या संगीतकार जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. यशोमानचा गाण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल यशोमान सांगतो, 'मला गाणी ऐकायला आणि गुणगुणायला आवडतात. पण असा प्रयत्न आपण कधी करू शकतो असे मला वाटले नव्हते. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडते. त्यामुळे गाण्याचा हा देखील प्रयत्न मी करून पहिला. यासाठी कीर्ती किल्लेदारने मला खूप मदत केली. तिने माझ्याकडून गाऊन घेतले असेच मी म्हणेन.'

 

Web Title: Yashovan of the butterfly became a singer by profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.