पंखुरी करते सीन्स आणि स्क्रिप्टचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 16:38 IST2017-06-10T07:47:47+5:302017-06-10T16:38:34+5:30

क्या कसूर है अमला का मालिकेतील पंखुरी अवस्थी सध्या तिच्या काम करण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे. ती सारखी फातमागूल ही ...

Wreaths and scripts studied | पंखुरी करते सीन्स आणि स्क्रिप्टचा अभ्यास

पंखुरी करते सीन्स आणि स्क्रिप्टचा अभ्यास

या कसूर है अमला का मालिकेतील पंखुरी अवस्थी सध्या तिच्या काम करण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे. ती सारखी फातमागूल ही मालिका दररोज बघते. ज्यामुळे तिला त्याच्या पुढली सीन्सची तयार करणे सोपे जाते. ती तिचे सीन्स आणि स्क्रिप्ट एक दिवस आधीच मागवून घेते आणि त्यावर काम करायला सुरुवात करते. तिच्या स्क्रिप्टची तयारी ती आधीच करुन ठवते. पंखुरी सांगते, '' मी एक कलाकार आहे आणि जेव्हा मी  काम करते तेव्हा माझ्यासाठी हा फक्त एक सेट नसून कार्यशाळा असते. एका मागोमाग एक 3 शो केल्यानंतर मला कळले की तुम्ही कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणून मी माझे सीन्स आधीच मागवून त्याचा अभ्यास करते. मी घरी गेल्यावर दुसऱ्यादिवशीत्या सीन्सच्या स्क्रिप्टवर काम करते आणि दुसऱ्यादिवशीच्या शूटसाठी तयार असते. डेली सोपसाठी 12 ते 16 तास शूट करणे एका  एका कलाकारासाठी आव्हानात्मक गोष्ट आहे. क्या कसूर है अमला ही  मालिका तुर्कीच्या फातमागुल या मालिकेवर आधारित असून एका  सामान्य मुलीच्या आय़ुष्यात काय काय घडते हे मालिकेत दाखवण्यात येते. पंखुरीची या मालिकेत मध्यवर्ती भूमिका आहे. काही महिन्यां अगोदर पखुंरीला चित्रिकरणा दरम्यान विजेचा शॉक लागला होता. पंखुरी शाहरुख खानची चाहती आहे तिची भविष्यात शाहरुखसोबत काम करण्याची इच्छा आहे. याआधी ती रझिया सुलतान या मालिकेत झळकली होती.  

Web Title: Wreaths and scripts studied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.