महिलांनी खेळले लेझीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:05 IST2016-09-08T10:35:56+5:302016-09-08T16:05:56+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सगळे सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात. आता या मालिकेत गणेशोत्सव ...

महिलांनी खेळले लेझीम
त रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच सगळे सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात. आता या मालिकेत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवेळी गोकुळधाम सोसायटीतील गणपतीची तयारी टप्पूसेना करते. पण यंदा ही जबाबदारी सोसायटीतील महिला सांभाळणार आहेत. सगळ्या महिला मिळून गणपतीसाठी डेकोरेशन करणार आहेत. तसेच सगळ्याच महिला महाराष्ट्रीयन वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एवढेच नाही तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सगळ्या मिळून लेझीमदेखील खेळणार आहेत.