पार्टीत बोलवून नेहाचा मन वळवण्यात यश यशस्वी होईल, की होणार नवी अडचण निर्माण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 20:34 IST2022-01-10T20:27:56+5:302022-01-10T20:34:55+5:30
Mazhi Tuzhi Reshimgaath: नेहा त्याच्यासाठी टिफिन आणेल असा विश्वास यशला असतो पण ती त्याच्यासाठी टिफिन आणत नाही

पार्टीत बोलवून नेहाचा मन वळवण्यात यश यशस्वी होईल, की होणार नवी अडचण निर्माण
'माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath)ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. यश, नेहासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देतो. पण यशाने त्याची खरी ओळख लपवून ठेवल्यामुळे नेहा खूपच दुखावली आहे. पण दुसरीकडे यश नेहाची समजूत काढण्याचे खूप प्रयत्न करतोय.
नेहा त्याच्यासाठी टिफिन आणेल असा विश्वास यशला असतो पण ती त्याच्यासाठी टिफिन आणत नाही आणि स्वतःही जेवत नाही. यशला विश्वास वाटतो की अजूनही ती आपला विचार करते. तो तिला लिफ्टमध्ये गाठून बोलायचा प्रयत्न करतो पण तिथेही बोलणं होत नाही. यशाची कॅम्पेन यशस्वी झाल्यामुळे सिम्मी सगळ्या ऑफिस स्टाफसाठी पार्टी अनाऊन्स करते. यश समीरवर जबाबदारी सोपवतो की काहीही झालं तरी नेहा पार्टीला आली पाहिजे. या पार्टीत सिम्मी यशासाठी काही नवीन अडचण निर्माण करणार का? यश नेहाशी पार्टीत बोलून तिची समजूत काढू शकेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
यशचं सत्य समोर आल्यावर नेहाने तिच्या नोकरीचा राजीनामा देताना दिसत आहे. इतकंच नाही तर यशदेखील तिचा राजीनामा स्वीकारतो. सोबतच तिला कंपनीच्या नियमानुसार, २ महिन्यांचा नोटीस पिरिअड द्यावा लागेल असं बजावून सांगतो. परंतु, यशने तिचा राजीनामा स्वीकारल्यामुळे समीर त्याच्यावर नाराज होतो. मात्र, या दोन महिन्यांमध्ये नेहाचं मन जिंकण्याचा मानस यशने केल्याचं तो सांगतो.