​सरस्वती या मालिकेत होणार सरू आणि राघवची भेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:55 IST2018-01-02T10:25:29+5:302018-01-02T15:55:29+5:30

सरस्वती मालिका ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत सरस्वती आणि ...

Will Saraswati and Satu and Raghav meet in this series? | ​सरस्वती या मालिकेत होणार सरू आणि राघवची भेट?

​सरस्वती या मालिकेत होणार सरू आणि राघवची भेट?

स्वती मालिका ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत सरस्वती आणि राघव हे पुन्हा एकत्र कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. या मालिकेमध्ये आता सरस्वती परतली असून यामुळे मालिकेला लवकरच वेगळे वळण मिळणार आहे. सरस्वती आता एका नव्या कुटुंबासोबत राहात आहे. याच कुटुंबामध्ये असलेल्या देवाशिष सोबत लग्न करण्यास सरस्वतीने होकार दिला आहे. सरस्वतीच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं शोधण्याचा ती सध्या प्रयत्न करते आहे. तिला स्वप्नामध्ये तिच्या भुताकाळातील काही आठवणी, जागा दिसत आहेत आणि ती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. देवाशिषचे सरस्वतीवर प्रेम नसून ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत. हे लग्न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे चिनुला सरस्वतीच्या रूपात तिची आई परत मिळेल असे त्याला वाटत आहे. पण येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळणार आहे. कारण, राघवची सरू म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी सरस्वती कैकालीमध्ये परतणार आहे. सरस्वती कैकाली मध्ये आल्यावर नक्की काय होईल? दुर्गा आणि सरस्वती एकमेकांना भेटतील का? सरू आणि मोठ्या मालकांची भेट होणार? दुर्गा आणि सरस्वती जर समोरासमोर आले तर? पुन्हा नव्याने सरू आणि राघवचा संसार सुरु होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना या मालिकेत मिळणार आहेत. 
बऱ्याच महिन्यांनी सरस्वती कैकालीमध्ये परतणार असल्याने सरस्वतीला स्वप्नामध्ये दिसत असलेल्या जागांचा संदर्भ गावामध्ये परतल्यावर तिला लागणार का? तसेच कैकालीच्या मंदिराला सरस्वती ओळखू शकेल का? हे बघणे रंजक असणार आहे. 
सरस्वती या मालिकेत तितिक्षा तावडे सरस्वतीची भूमिका साकारत असून राघवच्या भूमिकेत प्रेक्षकांना आस्ताद काळेला पाहायला मिळत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तितिक्षा तावडेची ही पहिलीच मालिका असली तरी तिच्या पहिल्याच मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. 

Also Read : सरस्वती फेम आस्ताद काळे लिहित आहे एक कथा

 

Web Title: Will Saraswati and Satu and Raghav meet in this series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.