पुंडलिकाची वारी पूर्ण होऊ शकेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 07:00 IST2018-07-09T14:58:05+5:302018-07-10T07:00:00+5:30

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आ

Will pundlik complete his trip? | पुंडलिकाची वारी पूर्ण होऊ शकेल का?

पुंडलिकाची वारी पूर्ण होऊ शकेल का?

ठळक मुद्देवारीचा हाच सगळा प्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतून उलगडणार आहे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतून उलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठी निघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे 'विठूमाऊली' मालिकेत पहायला मिळणार आहे  

पुंडलिकाच्या आईवर संकट आलं आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंड क्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो. कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचं उत्तर पुढील काही भागांतून मिळेल.   

तसंच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत. 

Web Title: Will pundlik complete his trip?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.