मिशालची मागणी पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 10:28 IST2016-06-18T04:58:47+5:302016-06-18T10:28:47+5:30
इश्क का रंग सफेद या कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारणार मिशाल रहेजा ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. मिशालचा या ...

मिशालची मागणी पूर्ण होणार?
इ ्क का रंग सफेद या कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारणार मिशाल रहेजा ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. मिशालचा या मालिकेसाठी असलेला करार हा पुढच्या महिन्यात संपणार आहे.नव्याने करार करण्यासाठी मिशालने पैसे वाढवून मागितले आहेत. मिशालने एका दिवसांसाठी जवळजवळ तीन लाख रुपये मागितले असल्याची चर्चा आहे. पण मिशालच्या मते त्याने इतक्या मोठ्या रक्कमची मागणी केलेली नाही. इश्क का रंग सफेद ही मालिका पूर्वी सोमवार ते शुक्रवार याच दिवसांत प्रसारित केली जात असे. पण आता ही मालिका संपूर्ण आठवडाभर दाखवली जाणार आहे. त्यामुळे कलाकारांना दररोज चित्रीकरण करावे लागणार आहे. यामुळेच त्याने पैसे वाढवून मागितले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पण त्याने तीन लाख इतकी मोठी रक्कम मागितले नसल्याचेही त्याचे म्हणणे आहे.