गणपती विराजमान होणार का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 14:43 IST2016-08-27T09:13:17+5:302016-08-27T14:43:17+5:30
गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे. गणपत्ती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडे जोरात तयारी सुरू आहे. इथेच टाका तंबू या मालिकेतदेखील आपल्याला ...

गणपती विराजमान होणार का
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे. गणपत्ती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळीकडे जोरात तयारी सुरू आहे. इथेच टाका तंबू या मालिकेतदेखील आपल्याला गणपतीचीच कथा पाहायला मिळणार आहे. कपिलच्या रिसोर्टमध्ये एक रिकामे मखर आहे. पण त्यातील गणपती कुठे आहे याची कल्पना कोणालाच नाहीये. सुरुवातीला या गोष्टीकडे कपिल दुर्लक्ष करतो. पण आता या मखरातील गणपती हा वडिलोपार्जित असल्याने कपिल तो शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा गणपती कुठे हरवला आहे की तो कोणी लपवला याचा तो शोध घेणार आहे. आता त्याला हा गणपती मिळतो का आणि हा गणपती मिळाल्यावर त्याची स्थापना केली जाते की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला काही दिवस नक्कीच वाट पाहावी लागणार आहे.