'देवमाणूस 2' नंतर झी मराठीवरील ही प्रसिद्ध मालिकाही येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ?, नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 11:53 IST2022-01-09T11:36:29+5:302022-01-09T11:53:10+5:30
काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसतात. त्या संपल्यानंतरही अशी मालिका परत होणे नाही अशा प्रतिक्रियाही उमटतात.

'देवमाणूस 2' नंतर झी मराठीवरील ही प्रसिद्ध मालिकाही येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला ?, नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क
काही मालिका या प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसतात. त्या संपल्यानंतरही अशी मालिका परत होणे नाही अशा प्रतिक्रियाही उमटतात. झी मराठीवरील अशा काही मालिकेत आहेत ज्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. मालिका संपल्या त्यांच्याजागी नव्या मालिका सुरुही झाल्या पण प्रेक्षकांचं संपलेल्या मालिकांवरचं प्रेम काही कमी झाले नाही. अलीकडेच 'देवमाणूस 2' (Devmanus 2 )ही मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आली आहे. यानंतर आता आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
ही मालिका दुसरी तिसरी कुणी नसून 'माझा होशील ना' (Maza Hoshil Na ) ही आहे. मालिकेत सईची भूमिका साकारणाऱ्या गौतमी देशपांडेने याचे संकेत दिले. गौतमीने तिच्या इस्टास्टोरीवर लिहिले होते, 'माझा होशील ना' या मालिकेबाबत मला तुमच्याशी काही तरी शेअर करायचं आहे बघुया तुमच्यापैकी कोणी ओळखंत का ते. तर या मालिकेत आदित्यची भूमिका साकारणाऱ्या विराजस कुलकर्णींही त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर मालिकेतील शूट केलेला अगदी शेवटचा शॉट शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विराजसने लिहिले, ''माझा होशील ना चा शूट केलेला अगदी शेवटचा शॉट. अनिकेत, आमचा दिग्दर्शक, एक दोन आठवड्यांपूर्वीच त्याच्या पुढच्या मालिकेच्या शूटिंगला गेला होता, पण खास ह्या वेळी शेवटचं ऍक्शन म्हणायला आणि शॉट okay करायला तो ही ऑनलाईन हजर होता. सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ एका बाजूला उभे राहून वाट बघत होते. आदित्य आणि संपूर्ण मालिका, दोघांच्या ही कथा एकत्र संपवण्यासाठी अगदी बरोब्बर असलेला हा शेवटचा क्षण!''
यानंतर ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आता यात किती तथ्य आहे हे आपल्याला लवकरच कळेल. 'माझा होशील ना' या मालिकेतील आदित्य आणि सईची प्रेमकथा प्रेक्षकांना आवडली होती. दोघांमधील केमिस्ट्री भावली होती. आता खरंच जर या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असले तर त्यांचे चाहते नक्की उत्सुक असतील.