बिग बॉसच्या घरात चौघांना वाईल्ड कार्ड एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 20:01 IST2016-11-24T14:22:46+5:302016-11-24T20:01:59+5:30

बिग बॉसच्या घरात एक दोन नव्हे तर तब्बल चार वाइल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. त्यामुळे या शोमध्ये आणखी ट्विस्ट ...

Wild card entry to four in Bigg Boss house | बिग बॉसच्या घरात चौघांना वाईल्ड कार्ड एंट्री

बिग बॉसच्या घरात चौघांना वाईल्ड कार्ड एंट्री

ग बॉसच्या घरात एक दोन नव्हे तर तब्बल चार वाइल्ड कार्ड एंट्रीज होणार आहेत. त्यामुळे या शोमध्ये आणखी ट्विस्ट निर्माण होणार असून, पुढील काही भागांमध्ये घरात घमासान बघावयास मिळेल यात शंका नाही. विशेष म्हणजे या वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेल्या प्रियंका जग्गा हिच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबरच साहिल आनंद, जेसन शहा आणि एलिना कझान ही नावेही पुढे आल्याने घरात वादळ येणार आहे, हे निश्चित आहे. 


दरम्यान पहिल्याच आठवड्यात घराबाहेबर पडलेल्या प्रियंका जग्गा हिचा घरातील एका आठवड्याचा सफर बराचसा वादग्रस्त ठरला होता. त्यावेळेस इंडियावाले विरुद्ध सेलिब्रिटी असा सामना असल्याने प्रियंकाने सेलिब्रिटींना धोबीपछाड देण्यासाठी कुठलीच कसर सोडली नव्हती. टास्कमध्ये देखील तिने बाजी मारली होती. मात्र ती पहिल्या आठवड्यातच घराबाहेर पडल्याने इंडियावाले यांची ताकद काहीशी कमी झाली होती. आता पुन्हा ती घरात प्रवेश करणार असल्याने प्रेक्षकांना आणखी काही घमासान बघावयास मिळणार आहे.  


वाइल्ड कार्ड एंट्री करणाºया दुसºया स्पर्धकांबाबत बोलायचे झाल्यास साहिल आनंद याची खरी ओळख टीव्ही कलाकार म्हणून आहे. मात्र, त्याने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आहे. करण जोहर यांच्या ‘स्टूडंट आॅफ द इयर’ या सुपरहिट चित्रपटात तो झळकला असून, त्याने वरूण धवन याचा क्लोज फ्रेंड जीत खुराणा ही भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्याने ‘बबलू हॅप्पी है’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच ‘रोडीज’ या प्रसिद्ध शोच्या चौथ्या भागात देखील सहभाग घेतला होता. त्याचबरोबर प्रसिद्ध टीव्ही सोप्स ‘एक नयी उम्मीद-रोशनी’ आणि ‘रंग बदलती ओढणी’मध्ये काम केले आहे.


जेसन शहा हा आंतरराष्टय स्तरावरील मॉडेल असून, या वर्षाच्या सुरुवातीलाच तो एका बॉलिवूडपटातून झळकला आहे. ‘फितूर’मध्ये तो कॅटरिना आणि आदित्य रॉय कपूर यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत होता. जेसन हा हॉट, किलर लूकसाठी ओळखला जातो. त्यामुळेच तो बराच काळ ‘आय कॅण्डी’ या शोबरोबर निगडीत होता. आंतरराष्टÑीय स्तरावर मॉडलिंग करताना त्याच्या बॉडीवरून तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. 


एलिना कझान हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती रशियन-जर्मन अभिनेत्री तथा मॉडेल आहे. बर्लिन येथे जाण्यापूर्वी तिचे बालपण युक्रेन येथे व्यतीत झाले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी ती यूएसला उच्च शिक्षणासाठी गेली. पुढे ती भारतात आली अन् कोलकत्ता येथील एका सेवाभावी संस्थेत सहभागी झाली. २०१० मध्ये तिने एका बंगाली चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली. पुढे २०११ मध्ये तिने ‘गांधी ते हिटलर’ या लघुपटात काम केले. पुढे ‘एजंट विनोद’मध्ये ती सैफ अली खान याच्याबरोबर झळकली. २०१३ मध्ये ती पहिल्यांदा मोठ्या बॅनरच्या ‘जॉन डे’ या चित्रपटात झळकली. यामध्ये तिने तब्बसुम हबीबी या महिलेची भूमिका साकारली. जी मद्याच्या आहारी गेलेली असते. पुढे तिने ‘प्राग’ या चित्रपटात जिप्सी मुलीची भूमिका साकारली जे स्वत:चा शोध घेण्यासाठी भारतात येत असते. 
दरम्यान यासर्व स्पर्धकांची एंट्री येत्या विकेण्डला म्हणजे शनिवारी होण्याची शक्यता आहे. सध्या बिग बॉस हाऊसमध्ये सुरू असलेले घमासान बघता या चारही स्पर्धकांची एंट्री लक्षवेधी ठरेल. 

Web Title: Wild card entry to four in Bigg Boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.