पौराणिक मालिका नाहीतर रिअॅलिटी शो करण्यात का आहे गुरमितला रस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 17:18 IST2016-11-29T17:18:35+5:302016-11-29T17:18:35+5:30
छोटा पडदा गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर दमदार एंट्री करणारा गुरमित चौधरीला टीव्ही मालिका करणार नसल्याचे सांगतिले आहे. सध्या तो ...

पौराणिक मालिका नाहीतर रिअॅलिटी शो करण्यात का आहे गुरमितला रस?
छ टा पडदा गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर दमदार एंट्री करणारा गुरमित चौधरीला टीव्ही मालिका करणार नसल्याचे सांगतिले आहे. सध्या तो सगळी मेहनत बॉलीवुडवर केंद्रीत करतोय. छोट्या पडद्यावर प्रभू रामाची भूमिका साकारण्याची संधी लाभली त्यामुळे तो स्वतःला नशिबवानही समजतो.सध्या गुरमित अनेक टीव्ही मालिका आणि पौराणिक मालिकांसाठी ऑफर्स येत आहेत. मात्र आता त्याला सिनेमा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. यासाठी त्याच्याकडे येणा-या अनेक टीव्ही ऑफर्सना नकार दिला आहे.याविषयी गुरमित सांगतो, आज मी जो काही आहे, जे काही मला यश मिळाले आहे ते या रामाच्या भूमिकेमुळेच मिळाले आहे. रसिकांना माझी भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे याचा मलाही आनंद आहे. मी सगळ्यात मोठी पौराणिक भूमिका साकारली होती हेसुद्धा मी जाणतो. मात्र पुन्हा एकदा मला एखाद्या पौराणिक भूमिकेत स्वीकारणे रसिकांनाही कठीण जाईल असे मला वाटते. बालपणापासूनच माझ्या कुटुंबीयांनी माझ्यातील अभिनय गुणांना वाव दिला. त्यामुळे लहानपणापासूनच मी स्वतःला अभिनेता समजू लागलो. टीव्ही या माध्यमाने मला सारे काही दिले आहे. त्यामुळे टीव्हीपासून मी दूर होणे शक्य नाही. सिनेमा करत असताना मालिका करणार नाही. मात्र रियालिटी शो जरुर करेन. गुरमित चौधरीने रामायण या मालिकेतील राम या व्यक्तिरेखेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याने साकारलेला राम प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. 'रामायण' या मालिकेनंतर 'गीत हुई सबसे पराई', 'पुनर्विवाह' यांसारख्या मालिकांमधून त्याने इमेज बदलण्याचा प्रयत्न केलाही मात्र तो अयशस्वी ठरला. पौराणिक मालिकेत काम करूनही आज सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा तो एकमेव अभिनेता असल्याचे खुद्द गुरमितने म्हटले आहे.त्यामुळे आता गुरमितला मालिकांमध्ये अडकून न राहता सिनेमासाठी काम करायचे आहे. काहीही झाले तरी पौराणिक मालिकांमध्ये काम करायचे नाही असे त्याने ठरवले आहे.