का दिव्यांका त्रिपाठीने मारली विवेक दहियाच्या कानाखाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 12:44 IST2017-11-15T07:14:43+5:302017-11-15T12:44:43+5:30
दिव्यांका त्रिपाठीने विवेक दहियाच्या कानाखाली मारली असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
.jpg)
का दिव्यांका त्रिपाठीने मारली विवेक दहियाच्या कानाखाली?
द व्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे छोट्या पडद्यावरचे एक खूप चांगले कपल मानले जाते. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कधी काही प्रॉब्लेम आहेत असे त्यांच्या चाहत्यांना कधी वाटतच नाही. त्यामुळे दिव्यांकाने विवेकच्या कानाखाली मारली हे वाचल्यावर त्यांच्या फॅन्सना नक्कीच धक्का बसला असेल. पण हे खरे आहे की दिव्यांकाने विवेकच्या कानाखाली मारली आहे.
यै है मोहोब्बते या मालिकेचे नुकतेच बुडापेस्ट येथे चित्रीकरण करण्यात आले. या मालिकेची संपूर्ण टीम बुडापेस्टला गेली होती. तिथे त्यांनी काम करण्यासोबतच खूप सारी मजा-मस्ती केली. तिथल्या मजा मस्तीचे सगळ्याच कलाकारांनी खूप सारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी देखील सोशल मीडियावर त्यांच्या या ट्रीपविषयी सगळ्यांना सांगितले आहे. विवेकने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हॅलोविनच्या निमित्ताने विवेकने त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक मास्क लावले असून त्याने या मास्कद्वारे दिव्यांकाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. तिची प्रतिक्रिया काय असेल हे व्हिडिओत कैद करण्यासाठी त्याने व्हिडिओ देखील सुरू केला. पण दिव्यांका न घाबरता तिने त्या मास्कवाल्या माणसाच्या कानाखाली लगावली.
Also Read : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस
दिव्यांकाने कानाखाली मारण्याचा व्हिडिओ पोस्ट विवेकने स्वतः अपलोड केला असून या वेळी घडलेली धमाल सगळ्यांना सांगितली आहे. हा व्हिडिओ बनवत असताना दिव्यांका हा मास्क घातलेला माणूस पाहून घाबरेल असे सगळ्यांना वाटले होते. पण असे काहीच झाले नाही. दिव्यांका आणि विवेकची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. विवेकसोबत लग्न करण्याआधी शरद मल्होत्रासोबत दिव्यांकाचे अफेअर होते. बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. त्या दोघांचे ट्युनिंग पाहाता ते लवकरच लग्नबंधनात अडकतील असे सगळ्यांना वाटत होते. पण काही कारणास्तव शरद आणि दिव्यांकाचे ब्रेकअप झाले.
शरदसोबतचे नाते तुटल्यानंतर दिव्यांका अतिशय दुःखी होती. या काळात ती ये है मोहोब्बते या मालिकेत काम करत होती. एका वर्तनामपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा काळ तिच्यासाठी खूपच वाईट असल्याचे तिने कबूल केले होते. ये है मोहोब्बते या मालिकेत विवेक दहिया तिच्यासोबत काम करत होता. याच दरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. तिच्या वाईट काळात विवेकने तिला साथ दिली. त्यांची ट्युनिंग पाहाता ते दोघे जीवनसाथी म्हणून योग्य असल्याचे याच मालिकेतील त्यांच्या एका सहकलाकाराला वाटले आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली.