बिग बॉसमध्ये आता कोणाची प्रेमकथा फुलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 17:46 IST2016-10-25T17:46:11+5:302016-10-25T17:46:11+5:30

बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांना एक तरी प्रेमकथा पाहायला मिळते. अरमान कोहली-तनिषा मुखर्जी, वीणा मलिक-अश्मित पटेल, कुशल टंडन-गोहर खान ...

Whose love story will blossom in Bigg Boss? | बिग बॉसमध्ये आता कोणाची प्रेमकथा फुलणार?

बिग बॉसमध्ये आता कोणाची प्रेमकथा फुलणार?

ग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांना एक तरी प्रेमकथा पाहायला मिळते. अरमान कोहली-तनिषा मुखर्जी, वीणा मलिक-अश्मित पटेल, कुशल टंडन-गोहर खान यांसारख्या अनेक जोडप्यांच्या प्रेमकथा आतापर्यंत बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अनेकवेळा या प्रेमकथा बिग बॉसच्या घरापर्यंतच मर्यादित असतात. एकदा कार्यक्रम संपला की, ही जोडपी आपापल्या वाटेवर जातात. तर काही वेळा हा कार्यक्रम संपल्यानंतर काही दिवस यांचे प्रेमप्रकरण टिकते आणि त्यानंतर यांचे ब्रेकअप होते. 
बिग बॉसच्या दहाव्या पर्वातही आता एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अशी चर्चा आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून मनू पंजाबी हा या सिझनचा तगडा स्पर्धक असल्याचे म्हटले जात आहे. मनू हा राजस्थामधील जयपूर येथे राहाणारा असून एक सामान्य मुलगा आहे. पण तो त्याच्या परिसरात चांगलाच प्रसिद्ध आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून त्याची मोना लिसासोबत चांगलीच मैत्री जमली आहे. मोना लिसा ही भोजपुरी इंडस्ट्रीतली नावाजलेली अभिनेत्री आहे. मनू आणि मोनामध्ये निर्माण झालेली जवळीक ही सध्या बिग बॉसच्या घरात चर्चेचा विषय बनली आहे. सगळ्यांनाच त्यांच्यात असलेले नाते जाणवत आहे. मनूनेदेखील त्याला मोनासारख्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असे तिला नुकतेच सांगितले आहे. ती एक चांगली पत्नी बनू शकते असेही त्याने मोनाला सांगितले आहे. या मनूच्या बोलण्यावर मोनाने काहीही उत्तर दिले नसले तरी ती हे ऐकून लाजली असल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात एक प्रेमकथा पाहायला मिळणार अाहे असेच सगळ्यांना वाटत आहे. 


Web Title: Whose love story will blossom in Bigg Boss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.