आता कोणाचा अपमान करणार कॉमेडी नाईट बचाओची टीम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 11:31 IST2016-10-28T11:31:01+5:302016-10-28T11:31:01+5:30

कॉमेडी नाईट बचाओ ताझामध्ये येणाऱ्या पाहुण्यांची खिल्ली उडवणे आता नवीन राहिलेले नाही. अनेकवेळा तर यामुळे सेलिब्रेटी  दुखावले गेल्याचेही आपल्याला ...

Who will now insult the comedy Night Saving Team? | आता कोणाचा अपमान करणार कॉमेडी नाईट बचाओची टीम?

आता कोणाचा अपमान करणार कॉमेडी नाईट बचाओची टीम?

मेडी नाईट बचाओ ताझामध्ये येणाऱ्या पाहुण्यांची खिल्ली उडवणे आता नवीन राहिलेले नाही. अनेकवेळा तर यामुळे सेलिब्रेटी  दुखावले गेल्याचेही आपल्याला पाहायला मिळाले आहे. तर विनोद करण्याची ही एक स्टाईल आहे असे काही सेलिब्रेटींचे म्हणणे असल्याने या गोष्टी त्या मनाला लावून घेत नाहीत. 
कॉमेडी नाईट बचाओ ताझामधील पुढील भागांमध्ये आता अरबाज खान, मिनिषा लांबा, अर्चना पुरण सिंग, डिनो मोरिया उपस्थिती लावणार आहेत आणि त्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी या मालिकेची टीम सोडणार नाही. अरबाजच्या फ्लॉप चित्रपटांविषयी आणि त्याच्या छोट्या पडद्यावरच्या फ्लॉप कार्यक्रमांविषयी त्याची मस्करी करण्यात येणार आहे. कृष्णा अभिषेक त्याची टर खेचताना म्हणणार आहे की, एका कार्यक्रमाचे परीक्षक सुरुवातीला शेखर होते. त्यानंतर जॉनी लिव्हर यांनी परीक्षकाची भूमिका साकारली. सोहेल खानदेखील त्या कार्यक्रमाच्या परीक्षकाच्या खुर्चीवर बसले आणि रोहित शेट्टी, तुषार कपूर यांनीदेखील या कार्यक्रमाचे परीक्षकपद भूषवले. पण अरबाज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला सुरुवात केली आणि तो कार्यक्रमच बंद पडला तर डिनो मोरिया फेमस नसल्याने त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कृष्णा काही टिप्स देणार आहे. भारती सिंग अर्चना पुरण सिंगची नक्कल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुदेशदेखील सोहेलसारखे कपडे घालून सोहेलची टांग खेचणार आहे. सलमान सोहेलला दर महिन्याला पॉकेटमनी देतो असे म्हणत सुदेश त्याची टर उडवणार आहे.
कॉमेडी नाईट या कार्यक्रमात याआधी अनेकवेळा सुदेशने सोहेलची तर भारतीने अर्चना पुरण सिंग यांची नक्कल केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा ते प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. 

Web Title: Who will now insult the comedy Night Saving Team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.