बिग बॉसच्या घरात आज कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सुरक्षित ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 05:55 AM2018-06-18T05:55:15+5:302018-06-18T11:25:15+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल भूषण कडू घराबाहेर पडला. त्याच्या जाण्याचे दु:ख बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यांच ...

Who will be going to the Big Boss house today? Who will be safe? | बिग बॉसच्या घरात आज कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सुरक्षित ?

बिग बॉसच्या घरात आज कोण होणार नॉमिनेट ? कोण होणार सुरक्षित ?

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल भूषण कडू घराबाहेर पडला. त्याच्या जाण्याचे दु:ख बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यांच झाले. आता येत्या आठवड्यामध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करणार ? कोण सुरक्षित होणार ? हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. बिग बॉस यांनी मागील आठवड्यामध्ये सदस्यांवर “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसी कार्य सोपावले होते. ज्यानुसार कॅप्टन तोच होणार होता जो विजयाचा झेंडा रोवेल. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतीकात्मक वापर होत असे. कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका होती. मागील आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे होते. या तिघांमध्ये सरस ठरत विजयाचा ध्वज फडकवण्यामध्ये पुष्कर यशस्वी ठरला आणि तो बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन बनला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु होणार असून घरातील सदस्य कोणती नवी युक्ती योजणार ? कोणाला नॉमिनेट करणार ?  

बिग बॉस आज सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. तसेच आज कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. जसेजसा फिनाले जवळ येत आहे तसा बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील स्पर्धा वाढताना दिसतेय. आता सामना अटी-तटीचा होताना दिसणार आहे. आतापर्यंत प्रत्येक जण आप-आपल्या ग्रुपमधून खेळत होता आता प्रत्येक स्पर्धक वैयक्तिक पातळीवर खेळताना दिसतील.त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात अधिक रंगत येणार आहे. 

Web Title: Who will be going to the Big Boss house today? Who will be safe?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.