​ब्रम्हराक्षसमध्ये आता कोणाची एंट्री होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 13:39 IST2016-10-26T13:39:47+5:302016-10-26T13:39:47+5:30

ब्रम्हराक्षस या मालिकेत नुकतीच पराग त्यागीची एक्झिट झाली. परागने रुपेरी पडद्यावर करियर करण्यासाठी या मालिकेला रामराम ठोकला. त्याच्यानंतर आता ...

Who will be the entry of the Brahmarasaksha now? | ​ब्रम्हराक्षसमध्ये आता कोणाची एंट्री होणार?

​ब्रम्हराक्षसमध्ये आता कोणाची एंट्री होणार?

रम्हराक्षस या मालिकेत नुकतीच पराग त्यागीची एक्झिट झाली. परागने रुपेरी पडद्यावर करियर करण्यासाठी या मालिकेला रामराम ठोकला. त्याच्यानंतर आता या मालिकेत किश्वर मर्चंट ब्रम्हराक्षसची भूमिका साकारणार आहे. परागच्या एक्झिटनंतर आता या मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे. निकुंज मलिक आता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निकुंजने याआधी गीत हुई सबसे प्यारी, 24 यांसारख्या अनेक मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. निकुंजने राहुल की दुल्हनिया या रिअॅलिटी शोद्वारे छोट्या पडद्यावर तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राहुल महाजनशी लग्न करण्यास उत्सुक असलेल्या स्पर्धकांपैकी ती एक होती. 
ब्रम्हराक्षस या मालिकेत तीरिषभ म्हणजेच अहम शर्माच्या पूर्वप्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. निकुंजला मिळालेली ही संधी खूप मोठी असल्याने या संधीचे सोने करण्याचे तिने ठरवले आहे. याविषयी निकुंज सांगते, "या शोचा हिस्सा होताना मला खूप आनंद होत आहे. या मालिकेची मला ऑफर आली, तेव्हा मी खूपच खूश झाले. या मालिकेतील माझी भूमिका थोडीशी नकारात्मक असणार आहे. खलनायिकेची भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. मालिकेत माझी एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाला अनेक नाट्यमय वळणे मिळणार आहेत. या मालिकेतील इतर कलाकारांसोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असला तरी क्रिस्टिना डिसोझा आणि मी एक हजारों में मेरी बहना है या मालिकेत एकत्र काम केले होते. त्यामुळे तिच्यासोबतचे माझे ट्युनिंग खूप चांगले आहे. ही माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे."

Web Title: Who will be the entry of the Brahmarasaksha now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.