n style="color: rgb(34, 34, 34); font-family: mangal, serif; font-size: 12.8px;">छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. 'नास्तिक' नावाची नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या सध्या चर्चा सुरु आहेत. या मालिकेत गुरु माँ ही भूमिका साकारण्यासाठी नवोदित शरणप्रीत कौरची निवड झाली आहे. ब-याच ऑडिशन्सनंतर या भूमिकेसाठी शरणप्रीतची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरणप्रीतची या मालिकेतील भूमिका खलनायिकेची असणार आहे. यांत शरणप्रीत आणि मालिकेत प्रमुख भूमिका साकारणा-या नायिकेमध्ये खटके उडत असल्याचे पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी देवांशी ही मालिका छोट्या पडद्यावर आली आहे. या मालिकेतील करुणा पांडे साकारत असलेल्या भूमिकेनंतर 'नास्तिक' मालिकेतील गुरु माँ रसिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. नास्तिक ही मालिका देवावर विश्वास नसणा-या एका तरुणीची कथा आहे. यातील प्रमुख नायिकेची भूमिका टीना फिलिप साकारणार आहे. टीना ही लंडनमधील मँचेस्टरची राहणारी आहे. तर टीनाच्या नायकाच्या भूमिकेत कंवर ढिल्लो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता शरणप्रीत आणि टीना यांच्यातील जुगलबंदी पाहण्याची संधी या नव्या मालिकेच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता येणार आहे.