धर्मेशच्या आयुष्यातील ती कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:11 IST2016-09-08T10:41:58+5:302016-09-08T16:11:58+5:30
डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे धर्मेश येलांडे लोकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या नृत्यावर सगळेच फिदा झाले. त्याला या कार्यक्रमानंतर सगळे ...

धर्मेशच्या आयुष्यातील ती कोण?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे धर्मेश येलांडे लोकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या नृत्यावर सगळेच फिदा झाले. त्याला या कार्यक्रमानंतर सगळे प्रेमाने धर्मेश सरच म्हणायला लागले. धर्मेश सध्या डान्स प्लस या कार्य़क्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये मेन्टॉरची भूमिका साकारत आहे. धर्मेश गेल्या काही वर्षांपासून एका मुलीच्या प्रेमात असून त्याने ही गोष्ट मीडियापासून लपवून ठेवली आहे. ब्रेशना खान असे त्या मुलीचे नाव असून या दोघांची भेट डान्स इंडिया डान्सच्या वेळीच झाली होती. इंडस्ट्रीमधील धर्मेशच्या मित्रमैत्रिणींना त्याच्या या नात्याची चांगलीच कल्पना आहे. पण ब्रेशना आणि धर्मेश यांचा धर्म वेगळा असल्याने धर्मेशच्या घरातून या नात्याला विरोध आहे. त्यामुळेच त्याने आपले नाते मीडियापासून लवपले असल्याचे म्हटले जात आहे.