चाहूल या मालिकेत सर्जाला करणार कोण आहे खरी शांभवी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 13:27 IST2017-10-19T07:57:17+5:302017-10-19T13:27:17+5:30
चाहूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी काही दिवसांपूर्वी वाड्यामध्ये आली असून ती खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे ...
(1).jpg)
चाहूल या मालिकेत सर्जाला करणार कोण आहे खरी शांभवी?
च हूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी काही दिवसांपूर्वी वाड्यामध्ये आली असून ती खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. सर्जाला सत्य पटवून देण्याचा राणी कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पण काही केल्या सर्जाला ही गोष्ट पटत नाहीये. मात्र आता मालिकेच्या कथानकाला एक खूप चांगले वळण मिळणार आहे. राणीच खरी शांभवी असल्याचे सर्जाला कळणार असून सर्जा ती गोष्ट मान्य देखील करणार आहे.
सर्जाला राणी शांभवीच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच वाड्यात एक विचित्र गोष्ट घडली होती, ती म्हणजे सर्जा सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध असल्याचे सर्जाच्या लक्षात आले होते. या व्यक्तीचे नाव साहेबराव असे होते. साहेबराव हा सुरेखाचा नवरा असून तो वाड्यामधून गायब आहे. सर्जाचा रोल साकारत असलेला अक्षर कोठारी या साहेबरावच्या लुकमध्ये अगदीच वेगळा दिसत आहे. या लूकमध्ये अक्षर पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा अशा रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चाहूल २ या मालिकेमधील अक्षरचा हा नवा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. प्रेक्षक त्याबाबत त्याचे कौतुक देखील करत आहेत.
अक्षरची पत्नी मानसी नाईकची नुकतीच चाहूल २ या मालिकेत एंट्री झाली आहे. ती या मालिकेत मंदाकिनी ही भूमिका साकारत असून ती सर्जेरावची दुसरी पत्नी असल्याचे दाखवले आले आहे.
मानसी आणि अक्षर हे खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असल्याने त्यांची खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. मानसी आणि अक्षरला एकत्र काम करायला मिळत असल्याने ते दोघे सध्या प्रचंड खूश आहेत. मानसीचा या मालिकेतील लूक प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
चाहूल २ मालिकेच्या कथानकाला आता वेगवेगळी वळणे येणार असून मालिकेतील अनेक रहस्य लवकरच उलगडणार असल्याचे म्हटले जात आहे. सर्जाला आता काय काय रहस्य कळतात हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.
Also Read : अक्षर कोठारी आणि मानसी नाईकची जोडी झळकणार चाहुल २ या मालिकेत