'देवमाणूस २' मालिकेतील ही फॉरेनर अभिनेत्री आहे तरी कोण?, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:00 AM2021-12-24T07:00:00+5:302021-12-24T07:00:00+5:30

'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि दुसऱ्या भागालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Who is this foreigner actress in 'Devmanus 2' series? Find out about her | 'देवमाणूस २' मालिकेतील ही फॉरेनर अभिनेत्री आहे तरी कोण?, जाणून घ्या तिच्याबद्दल

'देवमाणूस २' मालिकेतील ही फॉरेनर अभिनेत्री आहे तरी कोण?, जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि दुसऱ्या भागालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देवीसिंगच्या मृत्यूनंतर आता मालिकेत काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर ठरली. मालिकेच्या पहिल्या भागातच डॉ देवीसिंगच्या स्मृतीप्रित्यर्थ गावकऱ्यांनी डिंपलच्या हस्ते डॉक्टरच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्याच वेळी जैसलमेर येथे देवीसिंग नटवरलाल सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतो. हातचलाखी करून तो तेथे लोकांना त्यांचे पैसे डबल करून दाखवतो.आता या मालिकेत एका फॉरेनरची एन्ट्री झाली आहे. 

देवमाणूस २ मालिकेत जैसलमेरमध्ये एक फॉरेनर उभी असते त्यावेळी आपल्या जवळची नोट नाटवरलालला देऊन ती नोट डबल करून दाखवण्यास सांगते. परदेशी चलनातली नोट पाहून देवीसिंग बुचकळ्यात पडतो मात्र त्यानंतर काही वेळातच तो ती नोट देखील डबल करून दाखवतो. त्याची ही जादू पाहून परदेशी महिला डॉक्टरच्या मागे लागते आणि मला ही जादू शिकव असे म्हणते. मी तुला त्याबदल्यात खूप पैसे देईल असेही ती म्हणते. मात्र त्यानंतर त्या फॉरेनरचा मृत्यू होतो हा मृत्यू डॉक्टरनेच घडवून आणला असेल अशी शंका प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. 


फॉरेनरची भूमिका अभिनेत्री एलेना वेल्टर हिने साकारली आहे. एलेना ही जर्मन असून भारतातील अनेक ठिकाणी ती ट्रॅव्हल करताना पाहायला मिळते. या पूर्वी देखील तिने काही जाहिरातीत काम केले आहे. हयात रेंजन्सी धर्मशाळा रिसॉर्टच्या काही जाहिरातीत ती पाहायला मिळाली. पण अभिनय करताना देवमाणूस २ ही कदाचित तिची पहिलीच मालिका आहे. एलेना वेल्टर ही अभिनय आणि जाहिरातीं व्यतिरिक्त सामाजिक कार्य देखील करताना पाहायला मिळते. अनेक एनजीओना ती नेहमी मदत करताना पाहायला मिळते. काही शाळांमध्ये देखील तिने लेक्चर घेतले आहे.

Web Title: Who is this foreigner actress in 'Devmanus 2' series? Find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.