कोण पडणार कोणावर भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 16:00 IST2017-05-25T10:30:28+5:302017-05-25T16:00:28+5:30

लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अनेक रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर आले आहेत. लहान मुलांमध्ये असलेले कला गुण पाहुन ...

Who is the burden of anyone? | कोण पडणार कोणावर भारी ?

कोण पडणार कोणावर भारी ?

ान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अनेक रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर आले आहेत. लहान मुलांमध्ये असलेले कला गुण पाहुन मोठे-मोठे ही धक्क होतात. त्याच्या असलेले अभिनय, गायन आणि नृत्य कौशल्य वाखण्याजोग असते. मे महिन्यांच्या सुट्ट्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आणखीन एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येच आहे. सुपरस्टार्स vs बालकलाकार या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे सुपरस्टार्स हा कार्यक्रमाचा प्रेक्षकांना आस्वाद घेता येणार आहे. मराठीतले सुपरस्टार्स आणि लहान वयातच आपल्या अभिनयकौशल्याने रसिकांची जिंकणारे बालकलाकार यांच्यात चुरस रंगणार आहे. त्यामुळे ही चुरस पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे. यात काही शंका नाही.  


‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि बालकलाकार पुष्कर लोणारकर यांनी केले. मानसी नाईक ने सादर केलेली गणेशवंदना, भूषण पाटीलचा टपोरी डान्स, मेघा घाडगे यांची बहारदार लावणी, अभिजित आणि प्रसेनजीत कोसंबी यांची सुश्राव्य गाणी, अतुल तोडणकर, आशिष पवार, नम्रता आवटे, मेघना एरंडे यांचे ‘रिअॅलिटी शो’ हे धमाल स्कीटस् अशा मनोरंजनाच्या पॅकेजने पुरेपूर हा सोहळा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.‘महाराष्ट्राचे सुपरस्टार्स’ या कार्यक्रमात सुपरस्टार्स वरचढ ठरले की बालकलाकार भारी ठरलतील हे लवकरच आपल्याला कळेल. स्वप्निल जोशीला मराठीतली चॉकलेट बॉय म्हणून इमेज आहे. तर पुष्कर लोणारकर या बालकलाकारांने आपल्या अभिनयाची चुणूक एलिजाबेथ एकादशी या चित्रपटातून दाखवली आहे.  
 

Web Title: Who is the burden of anyone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.