'विघ्नहर्ता गणेश'मध्ये काम करताना मी वेदांबाबत खूप काही जाणले - निष्कर्ष दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:15 PM2019-01-29T20:15:32+5:302019-01-29T20:16:20+5:30

'विघ्नहर्ता गणेश'मध्ये भगवान गणेशाची भूमिका बालकलाकार निष्कर्ष दीक्षित साकारत आहे.

While working in 'Vighaharta Ganesha' I knew a lot about the Vedas - the conclusion was convincing | 'विघ्नहर्ता गणेश'मध्ये काम करताना मी वेदांबाबत खूप काही जाणले - निष्कर्ष दीक्षित

'विघ्नहर्ता गणेश'मध्ये काम करताना मी वेदांबाबत खूप काही जाणले - निष्कर्ष दीक्षित

googlenewsNext

अभिनय ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यात प्रत्येक भूमिकेबरोबर कलाकार प्रगत होतो आणि नवीन गोष्टी शिकत जातो. मालिका आणि त्यातील पात्रे जशी पुढे सरकतात, तसतशी कलाकारांची विविध संस्कृती आणि धर्म याबाबतची जाणीव अधिक विकसित होत जाते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'विघ्नहर्ता
गणेश'मध्ये भगवान गणेशाची भूमिका करणार्‍या निष्कर्ष दीक्षितच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले आहे. 

गणेशाच्या भूमिकेत निष्कर्षला पुराणांबद्दल नवनवी माहिती कळते आहे आणि त्याच्या समवयीन मुलांच्या तुलनेत त्याची त्याबाबतची समज देखील जास्त प्रगल्भ आहे. तो या भूमिकेत इतका बुडाला आहे की पडद्यावरील भूमिकेला संपूर्ण न्याय देण्यासाठी तो वेद आणि मंत्र शिकत आहे. सध्याच्या कथानकानुसार, प्रेक्षकांना दुर्गमासुराची गोष्ट बघायला मिळते आहे, ज्याने चारही वेद चोरले आहेत आणि त्यामुळे वेद त्यांची शक्ती गमावू लागले आहेत आणि पृथ्वीवरील लोक वेदिक मंत्र विसरू लागले आहेत. या आसुराकडून वेद परत मिळवण्याचे काम गणेश स्वतः अंगावर घेतो. वेदांना त्यांची शक्ती पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी तो मंत्र म्हणू लागतो व दुर्गमासुराकडून वेद यशस्वीरीत्या परत मिळवतो. त्याने जे चार मंत्र म्हटले, ते होते, ‘ओम असतो मा सद्गमय’, ‘ओम स्वस्ति न इन्द्रो’, ‘ओम द्यौः शांतिरंतरिक्षः’ आणि गायत्री मंत्र. निष्कर्षला त्यावर अभिनय करायचा असल्याने तो उत्साहाने वेद आणि मंत्र शिकला आणि त्याचे उच्चार व्यवस्थित होत असल्याची त्याने खात्री करून घेतली. वेळ मिळेल तेव्हा तो ते पाठ करत असे आणि आता ते त्याच्या जीवनाचा एक भाग झाले आहेत.
 तो म्हणतो, “मला यापूर्वी या वेद आणि मंत्रांचे ज्ञान नव्हते, पण त्या भागासाठी माझ्या दिग्दर्शकांनी मला सर्व नीट समजावले, जेणे करून मला मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची नस सापडावी. आपण आपल्या प्रार्थनेत हे वेद वापरत असतो पण आपल्याला त्यांचा अर्थ माहीत नसतो. उदा. आम्ही शाळेत प्रार्थनेचा एक भाग म्हणून ‘असतो मा सद्गमय’ म्हणायचो, पण त्याचा अर्थ आम्हाला माहीत नव्हता. पण आता त्याचा अर्थ आणि महत्त्व समजल्यानंतर आम्ही इतकी वर्षं जे म्हणत होतो, त्याला एक वेगळेच मूल्य प्राप्त झाले आहे. आता माझी एकाग्रता वाढवण्यासाठी मी माझ्या जीवनात या मंत्रांचा उपयोग करतो. 
घ्नहर्ता गणेश प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ७.३० वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.

Web Title: While working in 'Vighaharta Ganesha' I knew a lot about the Vedas - the conclusion was convincing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.