Bigg Boss Marathi 4च्या घरातील कोणत्या सदस्याला मिळाला पहिल्या कॅप्टन पदाचा मान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 11:21 IST2022-10-08T11:21:18+5:302022-10-08T11:21:36+5:30

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन नुकताच भेटीला आला आहे.

Which member of the Bigg Boss Marathi 4 house got the honor of being the first captain? | Bigg Boss Marathi 4च्या घरातील कोणत्या सदस्याला मिळाला पहिल्या कॅप्टन पदाचा मान?

Bigg Boss Marathi 4च्या घरातील कोणत्या सदस्याला मिळाला पहिल्या कॅप्टन पदाचा मान?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा चौथा सीझन नुकताच भेटीला आला आहे. या सीझनचा पहिला-वहिला कॅप्टन (Bigg Boss Marathi Season 4 First Captain) घराला मिळाला आहे. बिग बॉस मराठी ४च्या दसरा स्पेशल भागापासून कॅप्टनची निवड करायला सुरुवात झाली होती. अवघ्या चार दिवसात या १६ स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कॅप्टन्सीच्या शर्यतीत समृद्धी जाधवने (Samruddhi Jadhav) बाजी मारली आहे. 

बिग बॉस मराठी ४मध्ये पाहुणा म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे पोहोचला होता. त्याच्या 'आपडी थापडी'चे प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या माहितीनुसार बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.

सुरुवातीला या कॅप्टन्सीच्या स्पर्धेत अमृता देशमुख, समृद्धी जाधव आणि तेजस्विनी लोणारी या तिघी या रेसमधील होत्या. मात्र यशश्री मसुरकर हिने अमृताला या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी एलिमिनेट केले. यानंतर समृद्धी आणि तेजस्विनी यांच्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क झाला. यामध्ये समृद्धीने बाजी मारली आणि पहिला कॅप्टन होण्याचा मान पटकावला.

कॅप्टन्सी टास्कमध्ये पैशांचा पाऊस पडला. या दोघींना योगेशकडून सोने विकत घेण्याचे टास्क होते. योगेश या टास्कचा संचालकही होता. या टास्कमध्ये या दोन्ही स्पर्धकांना त्यांच्या तीन स्पर्धकांच्या साहाय्याने सोन्याची वीट खरेदी करायची होती. सर्व फेऱ्या संपल्यानंतर ज्याच्याकडे सर्वाधिक विटा असतील तो कॅप्टन होणार होता. या सोन्याच्या विटा खरेदी करण्यासाठी त्यांनी BB पॉइंट्स वाचावायचे होते. या टास्कमध्ये समृद्धीने बाजी मारली.

समृद्धी जाधवच्या टीमने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर केली आहे. 'ये रे यरे पैसा, #SassySamruddhiच्या बाजूने लागला फैसला! आपल्या टीमची साथ आणि स्वतःच्या जिद्दीने पहिला कॅप्टन्सी टास्क जिंकून समृद्धी बनली बिग बॉस ४ ची पहिली कॅप्टन!' असे कॅप्शन देत तिच्या इन्स्टा प्रोफाइलवरुन पोस्ट करण्यात आली आहे.

Web Title: Which member of the Bigg Boss Marathi 4 house got the honor of being the first captain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.