संतोष कुठे गायब झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 17:59 IST2016-10-20T17:59:39+5:302016-10-20T17:59:39+5:30

संतोष जुवेकर सध्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा, अभिनय प्रेक्षकांना ...

Where did Santosh disappear? | संतोष कुठे गायब झाला?

संतोष कुठे गायब झाला?

तोष जुवेकर सध्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा, अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो. तसेच या मालिकेतील मृणाल आणि त्याची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना चांगलीच भावते. संतोषने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला वादळवाट, किमयागार यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 2012मध्ये तो वेग या मालिकेत झळकला होता. पण त्यानंतर काही वर्षं तरी तो छोट्या पडद्यापासून दूरच राहिला. पण अस्स सासर सुरेख बाई या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर रिएंट्री केली. पण आता संतोषने या मालिकेच्या चित्रीकरणातून काही दिवसांचा ब्रेक घेण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. 
संतोष या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असल्याने त्याला मालिकेतून पूर्णपणे गायब करणे शक्य नाहीये. त्यामुळे त्याने या मालिकेतील अनेक भागांचे आधीच चित्रीकरण केले आहे. पण तरीही तो जवळजवळ दीड-दोन महिने चित्रीकरण करणार नसल्याने प्रेक्षकांना काही दिवस तरी संतोषला मालिकेत पाहायला मिळणार नाहीये.
संतोषने एक तारा, मोरया, झेंडा, रेगे यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या चित्रपटाची वाट त्याचे फॅन्स नेहमीच पाहात असतात. संतोषच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. तो सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असून याचसाठी त्याने मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
संतोष मालिकेत नसल्याने अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे फॅन्स त्याला नक्कीच मिस करणार आहेत. त्यामुळे तो या मालिकेत लवकरच परतेल अशी आपण आशा करूया. 

Web Title: Where did Santosh disappear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.