कधी येणार शेफाली जरीवालाचा पोस्टमार्टम रिपोर्ट? अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:54 IST2025-07-08T16:54:01+5:302025-07-08T16:54:21+5:30
'कांटा लगा' गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)चे २७ जून रोजी निधन झाले. तिच्या अचानक निधनाने सिनेइंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला.

कधी येणार शेफाली जरीवालाचा पोस्टमार्टम रिपोर्ट? अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ उलगडणार
'कांटा लगा' गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)चे २७ जून रोजी निधन झाले. तिच्या अचानक निधनाने सिनेइंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला. तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या, पण शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे गूढ पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच उलगडेल. अशा परिस्थितीत, शेफालीचा शवविच्छेदन अहवाल कधी येईल आणि त्यात कोणते पैलू उघड होतील, ते जाणून घेऊयात.
जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल काही शंका असेल किंवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असेल तर मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. परंतु रिपोर्ट येण्यासाठी सुमारे ६-१२ तास लागतात. परंतु विशेष बाब म्हणून, जर नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले तर हा वेळ आणखी वाढतो. शेफाली जरीवालाच्या बाबतीतही असेच काही घडत आहे, ज्यामुळे तिचा शवविच्छेदन अहवाल येण्यास आणखी वेळ लागू शकतो. यानंतर, तिच्या मृत्यूचे कारण काय होते, हे समजेल.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच कळेल मृत्यूचं कारण
याआधी शेफाली जरीवालाच्या अचानक मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे शवविच्छेदन अहवाल जाहीर झाल्यानंतरच उघड होईल. शेफालीचा मृत्यू शिळे पदार्थ खाल्ल्याने झाला का? अँटी एजिंग ट्रिटमेंटमुळे तिचा मृत्यू झाला का? तिचा मृत्यू नैसर्गिक होता की काही बाह्य कारण होते? शेफाली जरीवालासाठी अन्न विषबाधा घातक ठरली का? तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला की इतर कोणत्याही आजाराने? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे शेफाली जरीवालाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मिळतील.
हत्येचा संशय नाही
शेफाली जरीवालाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिचा पती पराग त्यागीसह १४ जणांची चौकशी केली. याशिवाय, त्यांनी घटनास्थळी पोहोचून तिच्या घराची झडती घेतली. सध्या शेफालीच्या मृत्यूला हत्येचा संशय मानता येत नाही, असे पोलिसांचे मत आहे. यामागील कारण पोस्टमार्टम रिपोर्टवरूनच कळेल.