जेव्हा कोरिओग्राफर अहमद खानने लावली 2 MAD च्या मंचावर लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 12:09 IST2017-02-23T06:39:33+5:302017-02-23T12:09:33+5:30

'2 MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर'च्या मंचावर नुकतेच बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतने हजेरी लावली होती. त्यानंतर आता कोरिओग्राफर अहमद खान ...

When Choreographer Ahmed Khan took a lavat on the stage of 2 MAD | जेव्हा कोरिओग्राफर अहमद खानने लावली 2 MAD च्या मंचावर लावली हजेरी

जेव्हा कोरिओग्राफर अहमद खानने लावली 2 MAD च्या मंचावर लावली हजेरी

'
;2 MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर'च्या मंचावर नुकतेच बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतने हजेरी लावली होती. त्यानंतर आता कोरिओग्राफर अहमद खान यांची 2 MAD च्या मंचावर धम्माकेदार एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे. यावेळी अहमद स्पर्धकांसाठी  खास सरप्राईजही  घेऊन आला होता. अहमद खान यांनी या मंचावर स्पर्धकांबरोबर बरीच धम्माल देखील केली, स्पर्धकांच्या डान्समध्ये असलेला मॅडनेस अहमद खान आल्यामुळे अजूनच वाढला असे म्हणायला हरकत नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा अहमद खान सोबतचा हा विशेष भाग तुम्हाला बघता येणार आहे.यावेळी या शोचे परीक्षक उमेश जाधव आणि अहमद खान यांनी 'कोंबडी पळाली' आणि 'बाय गो बाय गो' या गाण्यावर धम्माकेदार नृत्य सादर करत स्पर्धकांनाही फुल ऑन एंटरटेन केले.विशेष म्हणजे उमेश जाधव आणि अहमद खान यांचे दोघांचे विशेष नाते आहे. कारण उमेश जाधव यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातील अहमद खान यांच्याकडून नृत्याचे खास धडे गिरवले नाहीतर काही वर्षे अहमद खानसह असिस्टंट म्हणूनही काम केले होते. त्यामुळे उमेशच्या आयुष्यात अहमदचा मोलाचा वाटा राहिला आहे.विशेष म्हणजे उमेश अहदमला गुरूप्रमाणे माणतो. त्यामुळे मंचावर अहमदची एंट्री होताच उमेश अहमदच्या चरणी नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले.मात्र अहमदही त्यांच्या सहकलाकारांना एक शिष्याप्रमाणे नाहीतर मित्राचा दर्जा देतात. त्यामुळे या मंचावर अहमदने उमेशी निगडीत सगळ्या आठवणी रसिकांशी शेअर केले आहेत. दोघांचीही मैत्री आजतागायत तशी घट्ट आहे.त्यामुळे या मंचावर अहमद आणि उमेश या दोघांते अनेर रहस्यही या भागात उलडताना रसिकांना पाहायला मिळणार आहे. 



स्पर्धकांनी या भागामध्ये एक से बडकर एक डान्स करत अहमद खान आणि परीक्षकांना थक्क केले. छोटा पॅकेट, बडा धमाका म्हणजेच श्री दळवी आणि मंगेश याने ‘आता माझी सटकली’ या गाण्यावर डान्स केला. या परफॉर्मन्स मध्ये श्री दळवी हनुमान आणि मंगेश रावण बनले होते या गाण्यावर अश्या प्रकारचा डान्स बघायला मजा येणार आहे यात शंका नाही. श्री दळवी ह्याने अहमद खान यांना मिस्टर इंडिया या सिनेमातील  गाण्यावरील एक स्टेप शिकविण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी ती लगेच पूर्ण केली. श्री दळवी आणि अहमद खान यांनी या गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. अहमद खान यांच्या ‘जुम्मे कि रात’ या गाण्यावर शिवम आणि आकाशसोबत अहमद खान यांनी डान्स केला आणि त्यांच्या डान्सच्या मुव्हज आणि चेह-यावरील हावभाव यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले. तसेच आर्य आणि राहुल यांनी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांवर आधारित नृत्य सादर केले जे परीक्षकांना आणि अहमद खान यांना भावले. ‘अयगिरी नंदिनी’ या स्त्रोत्रावर सोनल (दुर्गा रूप) आणि तुषार (महिषासुर) यांनी अप्रतिम नृत्य सादर केले.

Web Title: When Choreographer Ahmed Khan took a lavat on the stage of 2 MAD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.