क्या कसूर है अमला का? या मालिकेतील पंखुडी अवस्थीने केले धरमशालाच्या थंडीत चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 17:08 IST2017-03-21T11:38:13+5:302017-03-21T17:08:13+5:30

क्या कसूर है अमला का? ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका आजवरच्या छोट्या पडद्यावरील सगळ्या मालिकांपेक्षा ...

What's wrong with the staff? The Pankhushi Awasthi performed in this series was filmed in cold storage | क्या कसूर है अमला का? या मालिकेतील पंखुडी अवस्थीने केले धरमशालाच्या थंडीत चित्रीकरण

क्या कसूर है अमला का? या मालिकेतील पंखुडी अवस्थीने केले धरमशालाच्या थंडीत चित्रीकरण

या कसूर है अमला का? ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका आजवरच्या छोट्या पडद्यावरील सगळ्या मालिकांपेक्षा वेगळी असणार असल्याचे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. त्यामुळे ही मालिका छोट्या पडद्यावर एक नवा इतिहास घडवणार अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
रझिया सुलतान, सूर्यपुत्र कर्ण यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी पंखुडी अवस्थी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी धरमशाला येथे सुरू होते. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना पंखुडीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. धरमशाला येथे कडाक्याची थंडी असतानादेखील या मालिकेच्या टीमने अनेक दिवस चित्रीकरण केले. वारंवार सुटणारा सुसाट्याचा वारा आणि बर्फवृष्टी यांना तोंड देतच या टीमला चित्रीकरण करावे लागले होते. पण अशा प्रतिकूल हवामानातही पंखुडीने अप्रतिम अभिनय केला. याविषयी पंखुडी सांगते, "धरमशाला ही जागा अतिशय सुंदर आहे. अतिशय निसर्गरम्य असे ते ठिकाण असून तिथे आम्ही नुकतेच चित्रीकरण केले. पण तिथे चित्रीकरण करत असताना आम्हाला तिथे बदललेल्या प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. तिथे खूपच थंडी होती. चित्रीकरण करणे खूपच कठीण होते. पण त्याही परिस्थितीत मी माझे 100 टक्के दिले आणि अभिनय केला. तिथे आम्ही अनेक महिने चित्रीकरण केले. इतक्या कडाक्याच्या थंडीचा केवळ एका स्वेटरने मुकाबला करणे खरे तर कठीण होते. पण तरीही या मालिकेसाठी मी ते आव्हान आनंदाने स्वीकारले. 




Web Title: What's wrong with the staff? The Pankhushi Awasthi performed in this series was filmed in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.