सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय बापमाणूस हा हॅशटॅग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:25 IST2017-11-23T05:55:35+5:302017-11-23T11:25:35+5:30
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर बापमाणूस या शब्दाला टॅग करत प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील बापमाणसाचा फोटो पोस्ट करत आहे. ...

सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय बापमाणूस हा हॅशटॅग?
फ सबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर बापमाणूस या शब्दाला टॅग करत प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील बापमाणसाचा फोटो पोस्ट करत आहे. त्यामुळे हा बापमाणूस हा हॅशटॅग काय आहे याचा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. बापमाणूस हा हॅशटॅग अभिनेता सुयश टिळक याने सुरू केला असून त्याच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात हा हॅशटॅग असल्याचे म्हटले जात आहे.
सुयश टिळकने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले होते की, Hello, माझं जीवभावाचे मित्रमंडळ आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना मला थोडे सांगायचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक #BaapManus असतो आणि तो एकच असतो ज्याच्यामुळे तुम्ही असता किंवा त्याचे तुमच्या आयुष्यातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. मी सुयश टिळक आपल्या आयुष्यातील अशा बाप माणसांना माझ्याकडून थँक्स बोलण्यासाठी #BaapManus हा हॅशटॅग वापरून एक चेन सुरू करत आहे... माझे बाबा हे माझ्या आयुष्यातील #BaapManus आहेत. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या सारखे तेच. सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणार. स्वतःच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणार आणि कधीही कोणाला न दुखवता छान हसत खेळत सगळ्यांना भेटणार. माझा #BaapManus माझे बाबा... तुमच्या आयुष्यात कोण आहे असं बापमाणूस? मी माझ्या काही मित्रांना टॅग करून त्यांच्या आयुष्यातला बापमाणूस कोण आहे ते विचारतो आहे? तुम्हीही विचारा... तुम्हीसुद्धा त्यांचा फोटो आणि ते बापमाणूस का हे स्पष्ट लिहून आपल्या मित्रपरिवारापैकी पाच जणांना टॅग करा आणि त्यांच्या आयुष्यातल्या बापमाणसाबद्दल लिहायला सांगा. #BaapManus करायला विसरू नका. हॅशटॅग English मध्ये करा तर globally हे celebrate करता येईल.
सुयशने ही पोस्ट लिहून त्याच्या वडिलांचा फोटो पोस्ट केला होता. सुयशच्या या आवाहानानंतर प्रिया बेर्डे, सिद्धार्थ चांदेकर, अक्षया देवधर, पियूष रानडे, शिल्पा नवलकर, स्वप्ना वाघमारे जोशी यांसारख्या मराठी इंडस्ट्रीतील अनेकांनी आपल्या आयुष्यातील बापमाणूस कोण आहे हे सांगत त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत.