तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमात सरस्वती आणि अमर फोटो स्टुडिओच्या टीमने लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:03 IST2017-12-11T10:33:44+5:302017-12-11T16:03:44+5:30
कलर्स मराठीवर नुकताच सुरू झालेला तुमच्यासाठी काय पन हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी ...
.jpg)
तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमात सरस्वती आणि अमर फोटो स्टुडिओच्या टीमने लावली हजेरी
क र्स मराठीवर नुकताच सुरू झालेला तुमच्यासाठी काय पन हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुशखुशीत विनोदशैली याने प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. या मंचावर महाराष्ट्राचे लाडके आणि अमाप लोकप्रियता मिळवलेले विनोदवीर एका पेक्षा एक स्कीट सादर करून सगळ्यांनाच हसवत आहेत. या कार्यक्रमात दर भागात कोणते ना कोणते सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. आता या आठवड्यात गुरुवारच्या भागात सरस्वती या लोकप्रिय मालिकेतील तितिक्षा तावडे म्हणजेच सरस्वती, आस्ताद काळे म्हणजेच राघव भैरवकर, विद्युल म्हणजेच सुलेखा तळवलकर आणि नयना आपटे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच शुक्रवारच्या भागामध्ये अमर फोटो स्टुडिओची टीम धमाल मस्ती करताना दिसणार आहे.
सरस्वती मालिकेमधील सरू म्हणजेच सरस्वतीची नुकतीच मालिकेमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या मालिकेच्या टीमने नुकतीच कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमाला भेट दिली. याआधी घाडगे & सून मालिकेमधील कलाकारांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावून Ramp Walk केला होता. या मालिकेतील कलाकारांनी जशी धमाल मस्ती केली, तशीच सरस्वतीच्या टीमने देखील केली यात काहीच शंका नाही. राघव आणि सरस्वतीला या कार्यक्रमामध्ये एक टास्क देण्यात आला होता. या टास्कनुसार दोघांनीही मंचावर फुगडी घातली, याचबरोबर आस्ताद काळेने एक छानसे गाणे देखील गायले.
अमर फोटो स्टुडिओच्या टीमने देखील तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमात हजेरी लावली होती. सुनील बर्वे, अमेय वाघ, सुव्रत जोशी, निपुण धर्माधिकारी, सखी गोखले, मनस्विनी लता रविंद्र यांनी या कार्यक्रमामध्ये खूप सारी मजा मस्ती केली. नाटकाच्या दौऱ्यांच्या दरम्यान केली जाणारी मजा मस्ती, प्रयोगांचे अनुभव, त्यांच्या मधील मैत्री या सगळ्याच गोष्टी त्यांनी या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांशी शेअर केल्या. या भागाची सुरुवात चार बॉटल वोडका या गाण्याने झाली. हे गाणे सुनील बर्वे, सुव्रत जोशी यांनी त्यांच्या स्टाईल मध्ये गायले. यानंतर सखी, अमेय आणि सुव्रत यांनी खास प्रेक्षकांसाठी नाटकातील काही भाग सादर केला. कार्यक्रमातील विनोदवीरांनी देखील खूप छान स्कीट सादर केले. याचबरोबर अमर फोटो स्टुडिओची टीम लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे देखील संपूर्ण टीमने यावेळी प्रेक्षकांना सांगितले.
Also Read : 'सरस्वती' मालिकेला नवीन वळण!